अजितदादा नव्हे, सुप्रिया सुळे ‘या’ नेत्याला ओवाळणार; जाहीरसभेत सांगितलं नाव

सुप्रिया सुळे यांची आज बंटी पाटील यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीमध्ये सभा पार पडली, यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अजितदादा नव्हे, सुप्रिया सुळे 'या' नेत्याला ओवाळणार; जाहीरसभेत सांगितलं नाव
Supriya Sule
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 9:10 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बंटी पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तुतारी वाजल्याशिवाय भाषण सुरू करता येत नाही. काँग्रेसवर प्रेम करणारे विश्वास ठेवणारे आपण सगळे लोक आहोत, बंटी दादा तुम्ही काळजी करू नका, सबका विकास होनेवाला है, तो कोणाच्या हाताने होणार तर बंटी पाटलांच्या हाताने होणार यामध्ये कुठलीही शंका नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आमची विचारधारा आमचं हक्काचं चिन्ह दुसरे घेऊन गेले. त्यानंतर कुठल्याही कार्यक्रमात तुतारी वाजवणारा माणूसच होता. शाहू महाराजांनी ज्यावेळेला युद्ध पुकारलं त्यावेळीही तुतारी वाजवणारा माणूसच होता. आता  हाताची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. बंटी पाटलांचं काँग्रेसवर प्रचंड प्रेम आहे. बंटीसाहेबांचं बहिणीवरचं प्रेम महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं नाही. बंटी साहेबांना मी आज ओवाळणार आहे. नात्यात व्यवहार कधी आणायाचा नाही, व्यवहार आला की त्यात प्रेम राहत नाही. या राज्यात लाडकी बहीण कधी नव्हती.  31 खासदार निवडून आले लगेच लाडकी बहीण योजना सुरू केली, याचं थोडसं क्रेडित बारामतीला मिळालं आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पंधराशे रुपये दिले म्हणून काय झालं? आमच्या बहिणी स्वाभिमानी आहेत. पैशासमोर वाकणार नाही. तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आमचं आपलं सरकार आल्यावर महागाई कमी करू. या भागात आले की आर. आर. पाटलांची आठवण येते. ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत. आर. आर. पाटलांनी जे काम केलं ते मी कधी विसरणार नाही, पण ते विसरले असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला.

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.