83 वर्षाचे शरद पवार 13 व्या दिवशीच भेटायला आले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इंटरेस्ट… धनंजय देशमुख यांची पहिल्यांदाच राजकीय नेत्यावरील नाराजी काय?

एकीकडे आरोप करत असताना दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. ही भेट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे बोललं जात आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

83 वर्षाचे शरद पवार 13 व्या दिवशीच भेटायला आले, चंद्रशेखर बावनकुळे यांचा इंटरेस्ट... धनंजय देशमुख यांची पहिल्यांदाच राजकीय नेत्यावरील नाराजी काय?
suresh dhas dhananjay munde dhananjay deshmukh
| Updated on: Feb 17, 2025 | 12:02 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या मुद्द्यावरुन भाजपाचे नेते सुरेश धस यांनीही आक्रमक पावित्रा घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. एकीकडे आरोप करत असताना दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. ही भेट भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी घडवून आणल्याचे बोललं जात आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चंद्रशेखर बावनकुळे यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे आंची भेट घडवण्यात जेवढा इंटरेस्ट होता, तेवढं गांभीर्य संतोष देशमुखांच्या घरी भेट घेण्याबद्दल का दाखवलं नाही, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.

इथे येऊन का सांत्वन केलं नाही?

शरद पवाह हे 83 वर्षांचे आहेत. तरीही तेराव्या दिवशी ते मस्साजोगला आले. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. ही भेट घडवायला त्यांना जेवढा इंटरेस्ट होता, तेवढं गांभीर्य बूथ प्रमुख संतोष देशमुख यांच्या घरी भेट घेण्यासाठी का घेतलं नाही? त्यांनी इथे येऊन का सांत्वन केलं नाही? गाव कोणाच्या प्रतिक्षेत नाही. मात्र आले त्यांना आम्ही आमची व्यथा सांगतो, हे त्यांना सुचायला पाहिजे होतं, असे धनंजय देशमुख म्हणाले.

आपण राज्याला काय मेसेज देणार?

बुथ प्रमुख हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो. संतोष देशमुख हे दहा वर्षापासून बुथ प्रमुख होते. बावनकुळे यांनी त्या भेटीपेक्षा या भेटीला महत्त्व द्यायला पाहिजे होतं. बूथ प्रमुखाला असंच संपवलं जातंय. आपण राज्याला काय मेसेज देणार, त्या संदर्भात त्यांनी कामगिरी घेतलं नाही. भाजप बूथप्रमुखांच्या हत्येच प्रकरण प्रदेशाध्यक्ष मिटवण्याचा प्रयत्न करतात का? असा सवाल धनंजय देशमुखांनी केला.

गावकरी आक्रमक

त्यांचा उद्देश काय होता हे नक्की माहीत नाही. मात्र आज मीटिंग झाल्यानंतर गावाने बोलल्यानंतर ते त्यांची भूमिका मांडतील. पण त्यांच्या भूमिकेला काही अर्थ असणार नाही. 70 दिवसात त्या माणसाला कधी कळलं नाही की एका भाजपाच्या एका बूथप्रमुखांची गंभीर घटना घडली, आपलं काम होतं, आद्य कर्तव्य होतं की तिथे जाणं, कुटुंबियाची भेट घेणं. हे सर्व महत्वाची कामे सोडून त्यांना समेट करणं महत्त्वाचे वाटले. त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत, असेही धनंजय देशमुख म्हणाले.