AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच…

शिवसेना ठाकरे गटातून 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरवर बोलताना सुषमा अंधारे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच...
sushma andhareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 21, 2026 | 5:08 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता शिवसेना ठाकरे गटात फक्त तीनच खासदार आहेत. दरम्यान आजच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरसंदर्भात पुरावा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंधारे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या बैठकीतला एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते लोकसभेच्या अध्यक्षांसोबत बसलेले आहेत. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ऑपरेशन टायगरचा प्लॅन हा 4 महिन्यांपासूनच शिजत होता, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे, सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी  राजुल पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना राजुल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे, भविष्यात माझे वडील आणि माझी राजकीय वाटचाल वेगळी असेल असं त्यांनी म्हटलं आहे. यावर देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला या लोकांवर विश्वास नाही,  त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील यावर विश्वास कसा ठेवायचा? खासदारांची पोरं आमच्यासोबत आहेत या भ्रमात आम्ही नाही, असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांना धमकी देखील येत आहेत, यावर बोलताना  मला धमकी येत आहे, त्यासंदर्भात मी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन