AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या व्यंगचित्रावरून सुषमा अंधारेंचा प्रचंड संताप; राणे ते खोत, पडळकर ते भुजबळ एकलाही सोडलं नाही, सगळंच काढलं

विरोधी पक्षांकडून सुषमा अंधारे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं आहे, हे व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर सुषमा आंधारे यांनी विरोधी पक्षांचा आपल्या खास शैलीमध्ये चांगलाच समाचार घेताला आहे.

त्या व्यंगचित्रावरून सुषमा अंधारेंचा प्रचंड संताप; राणे ते खोत, पडळकर ते भुजबळ एकलाही सोडलं नाही, सगळंच काढलं
sushma andhareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 4:52 PM
Share
गुरुवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. जर शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका काँग्रेससह भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं देखील घेतली होती. मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून आंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र त्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये. यावरून सध्या त्या ट्रोल होत आहेत. यावर एक व्यंगचित्र पोष्ट करत सुषमा अंधारे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 
‘ट्रोल करताना ट्रॉलिंगला सुद्धा एक दर्जा असला पाहिजे. दोन दिवसाच्या ट्रोलिंग मध्ये सगळ्यात दर्जेदार आणि मला आवडलेलं हे व्यंगचित्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामगार सेनेच्या कुण्या पाटलाने हे शेअर केलं. आता भाजपचा कामगार म्हटल्यावर त्याचे ब्रेड बटर याच्यावरच चालणार. त्यामुळे तो त्याच्या उपजीविकेसाठी करत आहे हे समजून घ्या आणि त्याला माफ करा. आता जरा पुढे जाऊया, हां तर या चित्रामध्ये मी सन्मानाने पक्षप्रमुखांकडे विधान परिषदेचा हट्ट धरते. फारच सुंदर कल्पना आहे. घरातल्या व्यक्ती या आपल्या कुटुंबप्रमुखाकडेच हट्ट करतात. घरातला बाप सोडून शेजाऱ्याला ते बाप म्हणत नाहीत. आणि बापाने आपला हट्ट पुरवला नाही तर ते बापाला सोडून दारोदार नवा बाप शोधत नाहीत.
हा ट्रोलिंग कामगार भलेही वेठबिगार असेल. पण याने जे या चित्रात दाखवलं ते फार महत्त्वाचं. कारण जिथे कुणी प्रकाश आंबेडकरांचा फोटो आपल्या कार्यालयात लावून त्यांना आपला दैवत बाप म्हणून नंतर भूमिका बदलल्या.
किंवा कोणी निवडणुकीत म्हणाला बिरोबाची शपथ माझ्या कुटुंबातला जरी कुणी उभं राहिलं तरी भाजपला मतदान करू नका ते नंतर भाजपसाठी वाटेल ते करायला लागले. सदाभाऊ खोत सारखा माणूस एकेकाळी राजू शेट्टींना आपला जिगर मित्र बाप भाऊ म्हणत होता त्यांच्याही भूमिका आता बदलल्या आहेत. महादेव जानकर यांना एकेकाळी मान्यवर कांशीरामजी वैचारिक आदर्श वाटत होते. आता मात्र4…. असो. प्रज्ञा सातव आपल्या सात पिढ्यांचा दाखला देत आपण काँग्रेसचे किती प्रामाणिक आहोत हे सांगत होत्या. पण भूमिका बदलली. बच्चु भाऊंचा विषय तर स्वतंत्र ग्रंथ लेखनाचा विषय आहे…!
राणेंना आधी बाळासाहेब ठाकरे बाप वाटायचे. मग काही काळ त्यांचं कुलदैवत दिल्लीच्या सोनिया गांधी झाल्या. सध्या ते नागपूरच्या आसरा म्हसोबाला पुजतात. त्यातही त्यांच्या दोन मुलांनी दोन वेगवेगळे बाप माणूस निवडले आहेत. अशोक चव्हाण यांचा बाप भाऊ चुलता सब कुछ काँग्रेस होतं. पण ED च्या दप्तराने त्यांचं गोत्र बदललं. चित्रा वाघ एकेकाळी पवार साहेबांना बाप म्हणायची…

भुजबळ मुश्रीफ तटकरे वळसे पाटील हे माझ्यापेक्षा प्रचंड श्रेष्ठ आहेत पण आपला राजकीय बाप थकलाय म्हटल्यावर त्यांना सुद्धा कालाय तस्मै नमः करत फडणवीसांनी आखून दिलेल्या फॅमिली ट्री सोबत नातं जोडावच लागलं… ज्या सांगलीच्या चंद्रहार पाटलांच्या साठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण काँग्रेसची वैर घेतले त्या चंद्रहारला अचानक त्याचा बाप बदलल्याची जाणीव झाली. राखी जाधव, देवरुखकर, बडगुजर असे अजून खूप सार्या चिल्लर खुरट्या झाडाझुडपांचा इथे उल्लेख करता येईल पण त्यामुळे लेख उगाच पाल्हाळ लावल्यासारखा होईल. पण काहीही असो. हे व्यंगचित्र आवडलं मला. कारण या व्यंगचित्रात मी माझ्या कुटुंबप्रमुखा सोबत आहे…! _प्रा. सुषमा अंधारे’  अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर शेअर  केली आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना