AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravikant Tupkar : शेतकरी संघटनेत पडणार फूट? राज्यभरात तुपकर दौरे करून तरुणाची फौज करणार ..

Raju Shetti : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कार्यकर्त्यांसोबत मोठी आंदोलनं केली आहेत.

Ravikant Tupkar : शेतकरी संघटनेत पडणार फूट? राज्यभरात तुपकर दौरे करून तरुणाची फौज करणार ..
Ravikant TupkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 03, 2023 | 8:58 AM
Share

गणेश सोलंकी, बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Paksha) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाद असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे दोन नेत्यांमध्ये नेहमी खटके उडत असल्यामुळे रविकांत तुपकर हे वेगळी चुल मांडण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात नुकताचं एक मोर्चा झाला. त्यावेळी त्या मोर्चाला राजू शेट्टी यांनी हजेरी लावली. राजू शेट्टी त्या मोर्चाला आल्याने रविकांत तुपकर यांनी त्या मोर्चाला जाणं टाळलं. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. त्याचबरोबर बुलढाण्यात राजू शेट्टी असताना रविकांत तुपकर यांनी भेट घेतली नाही. तेव्हापासून शेतकरी संघटनेत फूट पडणार का ? अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

संघटनेतच नव्हे, तर बाहेर ही चर्चा आहे ?

रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मागील काही काळापासून पटत नाही. त्यामुळे संघटनेतच नव्हे, तर बाहेर ही चर्चा आहे ? ती रविकांत तुपकर हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. नुकताचं बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोर्चा झाला. मात्र राजू शेट्टी आले असताना तुपकर त्याठिकाणी आले नाहीत. त्यामुळे तुपकर यांची नाराजी उघड झालीय. विशेष म्हणजे तुपकर राजू शेट्टी यांना भेटायला सुद्धा आले नाहीत. त्यामुळे संघटनेत फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. काल तातडीची जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी तुपकर यांनी संघटना कोणाची खाजगी मालमत्ता नाही, असे म्हणत संघटनेवर दावा केला की काय ? अशी चर्चा सुरू झाली आहे. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वाघाची शिकार होत नाही, असे म्हणत ही रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना टोला लगावला आहे.

शेतकरी संघटनेत पडणार फूट?

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्याचबरोबर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकदा कार्यकर्त्यांसोबत मोठी आंदोलनं केली आहेत. त्यामुळे ते मागच्या काही दिवसांपासून चांगलेचं चर्चेत आहेत. रविकांत तुपकर यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर संघटनेत फुट पडणार ही जोरदार चर्चा सुरु आहे.

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.