Swaine flu: स्वाईन फ्लूची कोरोनाशी स्पर्धा! मुंबईत चार रुग्ण लाईफ सपोर्टवर

मुंबई, शहरात इन्फ्लूएंझा H1N1 स्वाईन फ्लू (Swine flu) ची लागण झालेले चार जण लाईफ सपोर्टवर (Life support) आहेत. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव शहरात (Patients in Mumbai)  वाढत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्यांची कोरोना चाचणी  निगेटिव्ह आली आहे, त्यांनी स्वाईन फ्लूची चाचणी करावी असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितूनुसार  जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या  […]

Swaine flu: स्वाईन फ्लूची कोरोनाशी स्पर्धा! मुंबईत चार रुग्ण लाईफ सपोर्टवर
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:34 AM

मुंबई, शहरात इन्फ्लूएंझा H1N1 स्वाईन फ्लू (Swine flu) ची लागण झालेले चार जण लाईफ सपोर्टवर (Life support) आहेत. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव शहरात (Patients in Mumbai)  वाढत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्यांची कोरोना चाचणी  निगेटिव्ह आली आहे, त्यांनी स्वाईन फ्लूची चाचणी करावी असा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितूनुसार  जुलैमध्ये स्वाईन फ्लूच्या  11 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणज जूनमध्ये केवळ दोनच बाधित होते, मात्र आता ज्या झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वाईन फ्यूचे रोज   किमान दोन ते तीन प्रकरणे नोंदविल्या जात आहेत.

कोरोना प्रमाणेच स्वाईन फ्लू हा एक श्वसनचा रोग आहे जो 2019 मध्ये जागतिक महामारी म्हणून सुरू झाला होता. त्यावर लवकर उपचार पद्धती विकसित झाल्याने तो आटोक्यात आला होता. वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात, 50 वर्षांखालील दोन रुग्ण एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेनऑक्सिजनेशन (ECMO) थेरपीवर आहेत, ज्याला शेवटचा उपाय मानला जातो. जेव्हा व्हेंटिलेटर सपोर्ट देखील अयशस्वी होतो तेव्हा याचा उपयोग केला जाते. रुग्णालयातील स्वाईन फ्लू वॉर्डमध्ये आणखी पाच रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत.

पल्मोनोलॉजिस्ट डॉ प्रल्हाद प्रभुदेसाई यांनी सांगितले की, लाईफ सपोर्टवर असलेल्या रुग्णांचे स्वाईन फ्यूच्या संसर्गामुळे त्यांच्या  फुफ्फुसावर गंभीर परिणाम झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तपासारखी लक्षणे असलेले किमान 50% रुग्णांची स्वाईन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. स्वाईन फ्यू आता कोरोनाचा प्रतिस्पर्धी झाल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एचएन रिलायन्स रुग्णालयाचे डॉक्टर राजेश शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे तीन आठवड्यांपासून प्रकरणे वाढू लागली आहेत.  स्वाईन फ्यूच्या रुग्णांना उच्च ताप आणि वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाची सर्व लक्षणे असतील. परंतु त्यांची कोरोना  चाचणी नकारात्मक येईल, असेही ते म्हणाले, प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने स्वाइन फ्लूचे अचूक निदान झाल्यास उपचार करणे शक्य आहे.

हे सुद्धा वाचा

निदानास उशीर झाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे स्वाईन फ्यूची लक्षणे कोरोनासारखीच आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच स्वाईन फ्यूची चाचणी करणे आवश्यक आहे. दिलासादायक बाब म्हणजे प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध असल्याने  लवकर निदान झाल्यास स्वाईन फ्यू पूर्णपणे बरा होऊ शकतो.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.