AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य पुन्हा चर्चेत

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रीया देताना, शिंदेंना फटकारलं आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, असं म्हटलं आहे.

Eknath Shinde : तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, अभिजीत बिचुकलेंचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 21, 2022 | 7:56 PM
Share

सातारा : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे आपल्या वक्तव्यामुळे सदा चर्चेत असणारे नाव. काही दिवसांपुर्वीच बिचुकले यांनी आपण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसीठी अर्ज भरणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा राज्यात झाली होती. दरम्यान बिचुकले यांनी पुन्हा एकदा असेच वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची सगळ्यांना आठवण आली आहे. यावेळी बिचुकले यांनी सध्याच्या राजकीय नाट्यासह शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांच्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिचुकले यांनी त्यांच्या शैलित बोलताना, तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) कानाखाली जाळ काढला असता असं म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी नाराजीचा सुर ओढताना काही आमदारांसह आपला तळ गुजरातमध्ये हालवला आहे. तर शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावरच आक्षेप घेतला आहे. तसेच पुन्हा शिवसेनेने भाजपसोबत युती करावी, आपले हिंदुत्व जपावं अशी शिवेसेनेकडे मागणी केली आहे. त्यावर आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रीया देताना, शिंदेंना फटकारलं आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, असं म्हटलं आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणूकीनंतर राज्याचे राजकारण चांगलेच कलाटी खाणारे झाले आहे. तर तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री शिंदे यांनी शिवसेनेसह आघाडीलाच धक्का दिला आहे. तसेच ते सध्या गुजरात मध्ये आहेत. तर त्यांची नाराजी दुर करण्यासाठी शिवसेना नेते तेथे गेले आहेत. याराजकीय नाराजी नाट्यावर बिचुकले यांना विचारले असताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, आता याबाबत काय बोलावं, सर्वसामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. लोकांना अन्न मिळणं मुश्कील झालंय. जगणं कठीण झालंय. अशा परिस्थितीमध्ये शिंदे काय करत आहेत. आपला शिवसेनेशी संबंध नाही. मी अपक्ष आहे. पण आता जे सुरु आहे त्यावर मी एवढच बोलू इच्छितो की, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असते ना तर त्यांनी शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.