AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamil Nadu Election Results : थलपथी विजयची ऐतिहासिक मुसंडी; निकालाच्या भीतीने कट्टर चाहत्याने केलेलं कृत्य पाहून अंगावर येईल काटा

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपथी विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने १०४ जागांवर मुसंडी मारली आहे. मात्र, विजय यांच्या पराभवाच्या अफवेमुळे कृष्णगिरीत एका कट्टर समर्थकाने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tamil Nadu Election Results : थलपथी विजयची ऐतिहासिक मुसंडी; निकालाच्या भीतीने कट्टर चाहत्याने केलेलं कृत्य पाहून अंगावर येईल काटा
Thalapathy Vijay
| Updated on: May 04, 2026 | 1:02 PM
Share

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत अभिनेता थलपथी विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली आहे. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सिनेसृष्टीतील कारकिर्दीनंतर विजय यांनी राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांनी निवडणूक लढवत तब्बल १०४ जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे सध्या तामिळनाडूचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागलेले असतानाच कृष्णगिरी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

कृष्णगिरीमधील २८ वर्षीय महेंद्रन हा सुपरस्टार विजय यांचा कट्टर समर्थक आहे. मतमोजणीच्या काही तास आधी टीव्हीके निवडणूक हरत आहे अशी अफवा पसरली होती. या अफवेनंतर आपला लाडका नेता निवडणुकीत पराभूत होईल या भीतीने आणि पसरलेल्या अफवांना बळी पडून महेंद्रनने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपल्या घराबाहेर चाकूने स्वतःचा गळा चिरून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला कृष्णगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. एकीकडे विजय यांच्या चाहत्याने टोकाचे पाऊल उचलले असताना, प्रत्यक्ष निवडणूक निकालांचे कल मात्र थलपथी विजय यांच्यासाठी ऐतिहासिक विजयाची साक्ष देत आहेत.

तमिळनाडूमध्ये मोठ्या सत्तांतराचे संकेत

तमिळनाडूच्या २३४ जागांच्या प्राथमिक कलांमध्ये विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या दशकानुदशकांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. ताज्या निकालानुसार, टीव्हीके (TVK): १०५ जागा, AIADMK आघाडी: ७५ जागा आणि DMK आघाडी: ५० जागांवर आघाडीवर आहेत. हे कल पाहता तमिळनाडूमध्ये मोठ्या सत्तांतराचे संकेत मिळत आहेत. जर हे कल अंतिम निकालात परावर्तित झाले, तर थलपथी विजय राजकारणातही किंग ठरतील आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतील.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा