विद्यार्थी 1 पट तर शिक्षक 10 पट, थेट विद्यार्थ्यांच्या हेअरस्टाईलसाठी शिक्षकच सलूनमध्ये..
मुलांच्या हेअर स्टाईल, केस कापणे ही गोष्ट अलीकडे पालकांसाठी चांगलीचं डोकेदुखी बनली आहे. मुलांच्या केस कापण्याच्या पद्धतीवर पालकांची ओरड राहते. यातच आता शिक्षकांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.

सांगली प्रतिनिधी शंकर देवकुळे : शाळेतील मुलाची हेअरस्टाईल पालक आणि शिक्षकाची डोकेदुखी ठरत आहे. हल्लीच्या काळात फॅशन बदलतेय. त्यासोबत मुलांच्या हेअरस्टाईलही बदलत आहे. शाळेतील मुलाची केसांची हेअरस्टाईल पाहून ही शाळा आहे की फॅशन शो असा प्रश्न पालक आणि शिक्षकांना पडत आहे. पण यावर सांगलीच्या मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यावर भन्नाट उपाय शोधला आहे. पोरांचे केस कापायचे आहेत तर मग आधी गुरुजींना फोन करा आणि सलूनमधून फोन आला की गुरुजी थेट सलूनमध्ये जातात आणि मगच केस कापायचे काम सुरू होते. फळ्यावर धडे गिरवले जातात आणि शिक्षक विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करतात, पण लक्ष्मीवाडीच्या या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरही लक्ष दिलं आहे कारण विद्यार्थ्यांच्या बदलत्या हेअरस्टाईलने शिक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुलांच्या हेअर स्टाईल, केस कापणे ही गोष्ट अलीकडे पालकांसाठी चांगलीचं डोकेदुखी बनली आहे. मुलांच्या केस कापण्याच्या पद्धतीवर पालकांची ओरड राहते. केस कापण्यावरून आणि हेअर स्टाईल वरून पालका आणि मुलांच्या मध्ये वादावादीचे प्रकार घडत असतात. पण मुलांच्या समोर पालकही हतबल बनतात.
मात्र सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या लक्ष्मीवाडी येथे पालकांचा हा त्रास कायमचा संपला कारण. इथं केस कापण्यासाठी पालक नव्हे तर सलूनमध्ये मुलांच्या समोर चक्क गुरुजी उभे राहतात, आणि कोणतीही हेअर स्टाईल कट किंवा फॅशनला फाटा देऊन साध्या पद्धतीने मुलांची केस कापून घेतात. ऐकून थोडसं आश्चर्य वाटेल पण हे सगळं लक्ष्मीवाडीमध्ये शिक्षकांच्या कल्पक बुद्धीने हे घडत आहे.त्यासाठी शिक्षकांनी मग पालकांशी संवाद साधला.
पालक मुलाला घेऊन किंवा मुलगा सलूनमध्ये गेल्यावर मुलांचे केस कापताना सलून वाले ने आमच्याशी म्हणजे शिक्षकांशी एकदा फोनवर बोला.एवढंच पालकांना सांगितलं आणि या छोट्याशा कल्पनेने मोठा परिणाम घडवून आणला.मुलं सलूनमध्ये गेले की,पहिला फोन गुरुजींना आणि फोन येताच गुरुजी थेट सलूनमध्ये पोहचतात.
विशेष म्हणजे शिक्षकांनी हा निर्णय विद्यार्थ्यांवर लादला नाही. पालकांशी संवाद साधला पालकांना विश्वासात घेतलं
आणि त्यातूनच या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यामुळे शिक्षकांचा हा प्रयोग पालकांनीही स्वीकारला. कारण मुलांच्या हातात उद्याचं भविष्य आहे आणि त्या भविष्याला आकार देण्यासाठी शाळा आणि घर दोघांनीही एकत्र यायला हवं.