तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांतर्फे करावी, नीलम गोऱ्हेंचे उद्धव ठाकरे यांना निवेदन

| Updated on: Aug 21, 2021 | 10:26 PM

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे एक ऑडिओ क्लीपमधून पुढे आले होते. यासंदर्भात देवरे यांच्याशी काल (20 ऑगस्ट) विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वतः संपर्क केला. त्यानंतर गोऱ्हे यांनी आज (21 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांतर्फे करावी, नीलम गोऱ्हेंचे उद्धव ठाकरे यांना निवेदन
JYOTI DEORE NEELAM GORHE
Follow us on

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना होत असलेल्या त्रासामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे एक ऑडिओ क्लीपमधून पुढे आले होते. यासंदर्भात देवरे यांच्याशी काल (20 ऑगस्ट) विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्वतः संपर्क केला. त्यानंतर गोऱ्हे यांनी आज (21 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला सचिवांतर्फे करावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. (Tehsildar Jyoti Deore case should be investigated by senior women secretary Neelam Gorhe demands to Uddhav Thackeray)

सात दिवसात अहवाल सादर केला जाणार

ज्योती देवरे प्रकरणात विभागीय आयुक्त स्तरावरतील चौकशी चालू असून महसूल विभागामार्फतदेखील या घटनेमध्ये लक्ष घालण्यात आलेले आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी डॉ.गोऱ्हे यांनी संपर्क करुन या प्रकरणाचा आढावा घेतला. देवरे यांच्या प्रकरणात महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. येत्या सात दिवसात अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती भोसले यांनी नीलम गोऱ्हे यांना दिली.

चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल

या प्रकरणावर बोलताना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये काही वेळा मतभेद निर्माण होतात. कधी कधी विशेष हक्कांचा प्रश्नदेखील तयार होतो. दुसऱ्या बाजूला प्रशासनातील काही लोकं महिला अधिकाऱ्यांवर किंवा इतरांवर कुरघोडी करण्यासाठी अयोग्य गोष्टींचा वापर करताना दिसतात, असे गोऱ्हे म्हणाल्या. तसेच या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल. या दृष्टीकोनातून या चौकशीमधील तपशिलाची अपेक्षा असेल असे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या :

दारुच्या नशेत जन्मदात्या आईची हत्या, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे कार्यकर्त्याच्या अजित पवारांना शुभेच्छा! सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादांचाही प्रेमाचा सल्ला

(Tehsildar Jyoti Deore case should be investigated by senior women secretary Neelam Gorhe demands to Uddhav Thackeray)