दारुच्या नशेत जन्मदात्या आईची हत्या, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला

आई ही आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. पण काही विकृतांना जन्मदात्या आईची जाणीव नसते. अशाच एका बीडमधील विकृताने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दारुच्या नशेत जन्मदात्या आईची हत्या, बीडच्या घटनेने महाराष्ट्र हळहळला
प्रातिनिधिक फोटो

बीड : ज्येष्ठ कवी यशवंतराव पेंढारकर यांची आईवर एक खूप सुंदर आणि प्रसिद्ध अशी कविता आहे. ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी’, असे या कवितेचे बोल आहेत. या कवितेतील नायकाच्या घरात आई नाही. तो कदाचित आईच्या निधनाच्या शोकात आकांत बुडाला आहे. आपली आई घरी नाही, या विचाराने तो अस्वस्थ झाला आहे. त्याच्या मनाला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. त्यामुळे घराबाहेर कुणीही स्वत:च्या आईला हाक जरी मारली तरी कवितेतील नायक आपल्या आईच्या आठवणीने व्हिवळतोय.

अतिशय वेदनादायी आणि डोळ्यांमध्ये पाणी आणणारी ही कविता आहे. या कवितेचा संदर्भ देण्यामागचं कारण म्हणजे आपली आई ही आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत. पण काही विकृतांना जन्मदात्या आईची जाणीव नसते. अशाच एका बीडमधील विकृताने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही बीडच्या चौसाळा गावात घडली. हे गाव नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत येतं. आरोपी मुलाचं नाव पांडुरंग मानगिरे असं आहे. तो शुक्रवारी (20 ऑगस्ट) रात्री उशिरा घरी आला. त्याने घरी आल्यानंतर त्याची आई प्रयोगाबाई मानगिरे यांच्यासोबत वाद घातला. यावेळी त्याने आईला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत आईचा दुर्देवी मृत्यू झाला. काही तासांनी पहाटेच्या सुमारास आईचं निधन झाल्याचं नराधमाला समजलं. त्यानंतर तो घरातून पळून गेला.

आरोपीला बेड्या

या दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर आरोपी मुलाची शोध मोहिम सुरु केली. अखेर नेकनूर पोलिसांनी जालना जिल्ह्याच्या सीमेवर आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

आईचा राग, धारदार शस्त्राने हल्ला, जन्मदाती जमिनीवर धारातीर्थ, रक्तबंबाळ वृद्ध मातेचा तडफडून मृत्यू, सातारा हादरलं !

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI