बारामती : विविध पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याप्रति असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवत असतात. नेत्यांबद्दल असलेलं प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते कधी टोकाचा मार्ग वापरताना दिसून येतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असाच एक कार्यकर्ता पाहायला मिळतोय. अभिजीत काळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. काळे हे बारामतीमधील माजी नगरसेवक आहेत. काळे यांनी स्वत:च्या रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात. अजित पवार यांनीही आपल्या कार्यकर्त्याच्या शुभेच्छा तेवढ्याच प्रेमाने स्वीकारल्या. मात्र, त्यावेळी एक प्रेमाचा सल्ला द्यायलाही अजितदादा विसरले नाहीत. (Deputy CM Ajit Pawar’s advice to party workers)