विदर्भातून विधानपरिषदेसाठी चुरस, जुन्यांना संधी की नव्यांना लॉटरी?

विदर्भातील सात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून आतापासूनच रस्सीखेच सुरु झाली आहे (Maharashtra Assembly council members).

विदर्भातून विधानपरिषदेसाठी चुरस, जुन्यांना संधी की नव्यांना लॉटरी?
Follow us
| Updated on: Mar 02, 2020 | 4:35 PM

नागपूर :  विदर्भातील सात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून आतापासूनच रस्सीखेच सुरु झाली आहे (Maharashtra Assembly council members). भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये, रिपाईचे जोगेंद्र कवाडे, भाजपचे अनिल सोले यांच्यासह सर्वच विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी भाजपकडून आशिष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेत संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विदर्भातील सात विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ जुलै 2020 पर्यंत संपणार आहे. यात शिक्षक, पदवीधर मतदारसंघ, विधानसभा सदस्यांमधून निवड होणारे सदस्य आणि तीन राज्यपाल नियुक्त सदस्यांचा समावेश आहे. या सात जागांसाठी इच्छुकांनी आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरु केली आहे. शिवाय विद्यमान आमदारांनीही आपल्याला पुन्हा संधी मिळावी, यासाठी जोराचे प्रयत्न सुरु केले आहेत (Maharashtra Assembly council members). दरम्यान, कुणाला संधी द्यायची आणि कुणाला डावलायचं हे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांपुढे मोठं आव्हान असणार आहे.

विधानपरिषदेच्या ‘या’ सात सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार

सदस्य मतदारसंघ कार्यकाळ
अनिल सोले, भाजपपदविधर, नागपूरजुलै 2020
श्रीकांत देशपांडे, अपक्षशिक्षक, अमरावतीजुलै 2020
हरिसिंग राठोड, काँग्रेसवि. स. सदस्यांमधूनएप्रिल 2020
अरुण अडसड, भाजपवि. स. सदस्यांमधूनएप्रिल 2020
प्रकाश गजभिये, राष्ट्रवादीराज्यपाल नियुक्तजून 2020
जोगेंद्र कवाडे, रिपाईराज्यपाल नियुक्तजून 2020
ख्वाजा बेग, राष्ट्रवादीराज्यपाल नियुक्तजून 2020

सात विधानपरिषद सदस्यांपैकी काहींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत. विधानपरिषदेच्या सात जागांपैकी दोन जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपकडून पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार अनिल सोले यांची प्रबळ दावेदारी आहे. तर दुसऱ्या जागेसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही इच्छुकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये आणि रिपाईचे जोगेंद्र कवाडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी पुन्हा संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

विधानपरिषद जागांसाठी इच्छुकांनी आपलं ‘मिशन विधानपरिषद’ सुरु केलं आहे. यासाठी मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली. मात्र, भविष्यातील राजकीय गणितं बघून या सातही जागांवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा – तुकाराम मुंढेंचा दणका, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला स्वतः पालिका कार्यालयात नेलं

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.