AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भीषण अपघात, 3 ठार 14 जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, चाळीसगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. कन्नड घाटाच्या पायथ्याला हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भीषण अपघात, 3 ठार 14 जखमी
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2025 | 9:31 PM

मोठी बातमी समोर येत आहे, चाळीसगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. कन्नड घाटाच्या पायथ्याला हा अपघात झाला आहे. चालकाचा पिकअप वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप कठाड्याला धडकलं, हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे. देवदर्शनाहून परतताना हा अपघात झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावच्या चाळीसगाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तीन प्रवासी जागीच ठार, तर पाच प्रवासी  गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात  अन्य आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी आणि मृत व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील होते. ते सर्व जण देवदर्शनासाठी गेले होते.

छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगावकडे येत असताना पिकअप चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन वळणावरील कठड्याला जोरदार धडकले. या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर करंबळेकर यांनी दिली आहे. या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या अपघातानंतर घटामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. घाट मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. वाहनाचं देखील मोठं नुकसानं झालं आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.