AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तुळजापूर- औसा महामार्गावर भीषण अपघात, भाजपच्या बड्या नेत्याचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, जुळजापूर -औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! तुळजापूर- औसा महामार्गावर भीषण अपघात, भाजपच्या बड्या नेत्याचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 6:52 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, तुळजापूर -औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे, या अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा मृत्यू झाला आहे, आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर-औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आर. टी. देशमुख हे माजलगावचे माजी आमदार होते.

समोर आलेल्या माहितीनुसार महामार्गावरील बेलकुंड उड्डाण पुलावरून जात असताना त्यांची कार रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे स्लिप झाली, कार स्लिप झाल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. कार सुरक्षा कठडा तोडून चार वेळेस पलटी झाली, या अपघातामध्ये आर.टी. देशमुख हे गंभीर जखमी झाले हेते, त्यांना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

कार स्लिप झाल्यानं अपघात 

दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार तुळजापूर-औसा महामार्गावर हा अपघात झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बेलकुंड उड्डाण पुलावर कार स्लिप झाली, अनियंत्रीत झालेली कार सुरक्षा कठडा तोडून चारवेळेस पलटी झाली, या भीषण अपघातामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले हेते, त्यांना उपचारासाठी लातूरला नेत असताना वाटेच त्यांचा मृत्यू झला आहे. आर. टी. देशमुख यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोण होते आर. टी. देशमुख? 

आर. टी. देशमुख हे भाजपचे माजी आमदार आहेत. ते 13 व्या विधानसभेत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतानं विजयी झाले होते. त्यांच्या राजकारणावर गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव होता, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, त्यांनी पक्षांतर्गत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं. मनमिळावू , प्रेमळ आणि सर्वांना सहकार्य करणारा असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल