शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट समोर, एकाच दिवशी…

राज्यातील २९ महापालिका निवडणुका जाहीर झाल्या असून मुंबईसह इतर शहरांमध्ये मतदान अवघ्या महिन्याभरात आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या (राज-उद्धव) युतीची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, त्यांची अधिकृत घोषणा व जाहीरनामा एकत्रच येणार असून शिवाजी पार्क येथे ते संयुक्त सभाही घेतील. जागावाटपावर चर्चा सुरू असून जोरदार तयारी सुरू आहे.

शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट समोर, एकाच दिवशी…
ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट
Image Credit source: social media
| Updated on: Dec 17, 2025 | 9:13 AM

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून अवघ्या महिन्याबरावर मुंबईसह इतर महापालिकांत मतदान होईल. 15 जानेवारी रोजी मतदान तर 1 6जानेवारील मतमोजणी होऊन निकाल लागणार असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष झडझडून कामाला लागले आहेत. मात्र असं असलं तरा संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याकडे लक्ष लागलं आहे, त्या ठाकरे बंधूंच्या (Thackrey) युतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Rj hackrey) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हे आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू आहे. महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रच मैदानात उतरणार आहेत, मात्र युतीबाबत दोघांकडूनही अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा, अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र आता यासंदर्भात काही अपडेट्स समोर आले आहेत. राज व उद्धव ठाकरे या दोन्ही बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर होण्याची शक्यत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नव्हे हे दोन्ही भाऊ शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित घेऊन शक्तिप्रदर्शन करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवतीर्थ आणि मातोश्री अशा दोन्ही ठिकाणी घडामोडींना मोठा वेग आला असून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत ही अपडेट समोर येत आहे.  लवकरच त्यांच्या युतीची घोषणा होऊ शकते, मात्र त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

युती आणि जाहीरनामा एकत्र ?

युतीसाठी ठाकरे बंधू अनुकूल असून कालच शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शिवतीर्थ आणि मातोश्री येथेही चर्चा, खलबतं सुरू असून ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करतील असा अंदाज व्यक्त होत आहे, त्याच दिवशी त्यांच्या जाहीरनाम्याचीही घोषणा होऊ शकते. तसेच ठाकरे बंधूंची ताकद दाखवण्यासाठी, शक्तीप्रदर्शन करण्यासाठी राज व उद्धव हे दोघेही शिवादी पार्क येथे एकत्रित सभाही घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

मनसे आणि ठाकरेंच्या सेनेने आपापल्या पक्ष निरीक्षकांकडून प्रभागनिहाय अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, कोणत्या प्रभागात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. जाहीरनाम्यात आणि निवडणुकीच्या प्रचारात कोणते मुद्दे असावेत यासाठी नेत्यांची खलबतं, चर्चा जोमाने सुरू असून खुद्द राज ठाकरे यांचेही त्यावर बारकाईने लक्ष आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही नेत्यांच्य सभाही घेण्यात येणार असून त्याचेही तपशीलवार नियोजन सुरू आहे.

उद्धव सेनेकडून 350 जण इच्छुक , आज पार पडणार मुलाखती

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून इच्छुकांनी चार दिवसांत साडेतीनशे जणांनी अर्ज नेले आहेत. आज पासून या इच्छुकांच्या मुलाखती शिवसेना भवनात घेण्यात येणार आहेत.  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दोन दिवसांपासून पक्षाच्या तीन विधानसभा शहरप्रमुखांमार्फत इच्छुकांना अर्ज वाटप करण्यात आले. मागील चार दिवसांत साडे तीनशे इच्छुक अर्ज घेऊन गेले आहेत.

काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा

दरम्यान राज व उद्धव या ठाकरे बंधूंच्या युतीच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने या युतीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. राज-उद्धव यांच्या राजकीय युतीच्या वेळी काँग्रेसला विश्वासात घेतले गेले नव्हते असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. मुंबईतील लोकांना धर्म आणि भाषेच्या आधारावर विभागणी नको आहे. त्यांना मुंबईत विकास आणि चांगली हवेची गुणवत्ता हवी आहे असं त्यांनी नमूद केलं.”अशा परिस्थितीत आम्ही एकटेच निवडणूक लढवू. आमच्या स्थानिक युनिटने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा आणि कार्यकर्त्यांना बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.” असंही सावंत यांनी स्पष्ट केलं.