BMC : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता, पण अर्धी मुंबई ठाकरेंच्या ताब्यात, प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?

मुंबई महापालिकेत महायुतीकडे सर्वाधिक जागा असूनही १८ पैकी ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व राहणार आहे. यामुळे पूर्ण सत्ता नसतानाही अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचा प्रभाव कायम राहील. एमआयएमला एक प्रभाग समिती मिळाली असून, काही ठिकाणी सदस्यसंख्या समान असल्याने अध्यक्ष निवडीसाठी चिठ्ठीचा वापर केला जाईल, ज्यामुळे सत्तावाटपाचे नवे समीकरण समोर आले आहे.

BMC : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता, पण अर्धी मुंबई ठाकरेंच्या ताब्यात, प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?
मुंबई महानगरपालिका
| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 9:00 AM

राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक होऊन आणि निकाल लागून जवळपास 2 आठवडे उलटलेत. राज्यातील सर्वांच लक्ष वेधणार मुंबई महापालिकेची निवडणूकही यंदा खऊप चुरशीची ठरली. शिवेसना ठाकरे गट- मनसे आणि भाजप
– शिंदे यांची महायुतकी, यांच्यात प्रामुख्याने मुंबई महापालिकेसाठी लढत होती. महायुतीने भाजप-शिंदेंनी बहुमत मिळवलं असून त्यांचाच महापौर होणार हे निश्चित . मात्र या नितालाल 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही महापौर पदाचा निर्णय काहीही झालेला नाही. याच दरम्यान मुंबई महापालिकेत एक मोठा ट्विस्ट पहायला मिळू शकतो. भाजप-शिंदे गटाला बहुमत मिळाल्याने त्यातही भाजपचे जास्त नगरसेवक निवडमून आल्यानेच त्यांचाच महापौर होणार आणि मुंबई पालिकेवर त्यांची सत्ता असणार हे निश्चित आहे. मात्र असं असलं तरीही अर्धी मुंबई ही ठाकरेंच्याच ताब्यात येणार असल्याचं दिसतंय.

प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?

मुंबई महापालिकेच्या 18 प्रभाग समितींपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. मात्र मुंबई शहर आणि उपनगरातील पालिकेच्या विभागमध्ये महायुती आणि ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार आहे.

महापालिकेमध्ये एकूण विभाग कार्यालयाच्या 18 प्रभाग समिती आहेत. या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे नगरसेवक समित्यांच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची महानगरपालिकेमध्ये सत्ता नसली तरी अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे भाजप-शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांची गोवंडी एम पूर्व विभागात सत्ता येणार असणार आहे. या प्रभाग समितीवर एमआयएमचे आठ सदस्य तर भाजप शिवसेनेचे सहा व ठाकरे यांचा एक नगरसेवक असणार आहे. भांडुप एस विभाग आणि मुलुंड विभाग प्रभाग समितीवर ठाकरे बंधू आणि महायुतीचे समसमान सदस्य राहणार आहेत. त्यामुळे येथील अध्यक्ष हा चिट्टीवर ठरणार आहे. त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार याचा अंदाज बांधणे शक्य नाही.

कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता ?

१) ए बी इ – महाविकास आघाडी
२) सी डी – महायुती
३) एक दक्षिण एफ उत्तर – महाविकास आघाडी
४) जी दक्षिण – महाविकास आघाडी
५) जी उत्तर – महाविकास आघाडी
६) एच पूर्व एच पश्चिम – आघाडी
७) के दक्षिण – महायुती
८) के उत्तर – महाविकास आघाडी
९) के पश्चिम – महायुती
१०) पी दक्षिण – महायुती
११) पी पूर्व पी पश्चिम – आघाडी
१२) आर दक्षिण – महायुती
१३) आर मध्य आर उत्तर – महायुती
१४) एम पूर्व – एम आय एम
१५) एम पश्चिम – महायुती
१६) एस व टी – समसमान सदस्य
१७) एल – महाविकास आघाडी
१८) एन – महायुती

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us