ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखावर ठाण्यात गोळीबार, मास्क घालून हल्लेखोर आले
शिवसेना ठाकरे गटाचा एका नेत्यावर ठाण्यातील मनोरमानगर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबार करणारे मास्क घालून आल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा एका नेत्यावर ठाण्यातील मनोरमानगर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर मास्क घालून आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर कापूरबावडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख्य प्रदीप पुर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना ठाण्याच्या मनोरमानगर परिसरात घडली आहे. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या प्रदीप पुर्णेकर यांना आर मॉलजवळील इन्फिनीटी हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
ही घटना घडल्यानंतर कापूरबावडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आणि या घटनेचा सर्व अंगाने तपास केला जात आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्लेखोरांनी मास्क परिधान केले होते अशी माहिती उघडकीस आली आहे. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्या मागच्या कारणांचा तपास केला जात आहे.
