ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने मशाल गीतातील ‘तो’ शब्द काढायला सांगितला; उद्धव ठाकरे यांचा थेट राज्यकर्त्यांना सवाल काय?

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी राज्यकर्ते आमच्यावर टीका करतात करतात. त्यांच्या हाताखाली आयोग काम करतो. हिंदू धर्म हा शब्द काढायला लावणं हे योग्य आहे का  ? असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान सहन करणार नाही असे म्हणत आम्ही प्रचार गीतामधून जय भवानी हा शब्द काढणार नाही असेही असे उद्धव ठाकरेंनी ठणकावू सांगितलं.

ठाकरेंना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने मशाल गीतातील 'तो' शब्द काढायला सांगितला; उद्धव ठाकरे यांचा थेट राज्यकर्त्यांना सवाल काय?
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 1:03 PM

शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचार गीतातील हिंदू धर्म, जय भवानी हे शब्द वापरल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली. हे दोन्ही शब्द काढून टाकायला सांगितले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं अशी राज्यकर्ते आमच्यावर टीका करतात करतात. त्यांच्या हाताखाली आयोग काम करतो. हिंदू धर्म हा शब्द काढायला लावणं हे योग्य आहे का  ? असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान सहन करणार नाही असे म्हणत आम्ही प्रचार गीतामधून जय भवानी हा शब्द काढणार नाही असेही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.  एवढंच नव्हे तर पंतप्रधान मोदी, अमित शाह हे देवाच्या नावाने मत मागतात ते चालतं का ? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली. आमच्यावर कारवाई करणार असाल तर आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मी आज बुलढाण्याला जात आहे. प्रचार सुरू करत आहे. प्रचारात मूळ मुद्दे बाजूला पडले की काय असं चित्र आहे. १० वर्षात मोदी सरकारने काय केलं. याला बगल दिली जात आहे. दुसऱ्या विषयाला हात घालून भूलवलं जात आहे. मध्यप्रदेश, तेलंगना कर्नाटकात निवडणुका झाल्या. त्यावेळी मी तुमच्याशी बोललो होतो. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती. माझ्या फोनमध्ये व्हिडीओ आहे. मी ऐकवतोय. अमित शाह, अयोध्येत राम मंदिराचं दर्शन करायचं ना. खर्च होणार ना. मी म्हणतो, नाही होणार. तुम्ही ३ डिसेंबरला मध्यप्रदेशात भाजपचं सरकार बनवा आम्ही तुम्हाला दर्शन घडवू

हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल. आम्ही त्यावेळी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. त्याला कारणही तसंच होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढला होता. त्यांना सहा वर्षासाठी काढला होता. करप्ट प्रॅक्टिस म्हणून कारवाई केली. हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने त्यांचा अधिकार काढला. पण भाजप उघड उघड धार्मिक आधार घेत आहे. आम्ही त्यावर आयोगाला विचारलं की तुम्ही कायद्यात काही बदल केला का. बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणून मोदी सांगत आहे. हा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेत बसते का असं विचारलं होतं. आम्ही त्यांना स्मरण पत्र लिहिलं होतं. त्यावर आम्हाला उत्तर आलं नाही. आम्हाला उत्तर द्या. नाही तर नियम बदलला असं गृहित धरून आम्हीही तसा प्रचार केला तर आमच्यावर कारवाई करू नये असं आयोगाला म्हटलं होतं.

आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत मागितलं नाही 

मनोहर जोशींची सर्वोच्च न्यायालयात केस झाली होती. त्यात हिंदू धर्माची व्याख्या वेगळी केली आहे. आम्ही हिंदू धर्माच्या आधारे मत नाही मागितलं. आम्ही हिंदू धर्म सोडला अशी आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडे चाकर असलेल्या आयोगाने त्यावर उत्तर दिलं पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान म्हणाले की, बजरंग बली की जय बोलून मतदान करा. अमित शाह म्हणाले की आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला अयोध्येला नेऊ.

तुळजा भवाईनी हे महाराष्ट्राचं दैवत आहे. कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. निवडणूक आयोगाला आम्ही तेव्हा हेही सांगितलं होतं की उद्या भाजपला परमिशन देत असाल तर उद्या आम्ही हर हर महादेव बोललो, जय भवानी जय शिवाजी बोलल्यावर त्याला आक्षेप असता कामा नये.

आधी मोदी, शाहांवर कारवाई करा

आम्ही जे गीत दिलं होतं त्या गीतात त्या गाण्याचा जोश वाढतोय. कोरसला जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढा. हा लेखी फतवा आला आहे. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

 राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राबद्दल आकस

राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राबद्दलचा आकस ठासून भरला आहे. पण महाराष्ट्रातील कुलदैवतांबाबतचा आकस असेल याची आम्हाला कल्पना नव्हती. तुम्ही कितीही ठरवलं तरी जतना बघून घेईल. ही महाराष्ट्राची घोषणा आहे. आज जय भवानी शब्द काढायला सांगितलं, उद्या जय शिवाजी हा शब्द काढायला सांगाल. आम्ही त्याविरोधात लढत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावू सांगितलं.

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.