AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या मुंबईतील खासदाराचे स्पष्टीकरण, म्हणाला “दिल्लीपासून मुंबईपर्यंत…”

संजय दिना पाटील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यावर संजय दिना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शिंदे गटाच्या वाटेवर असलेल्या मुंबईतील खासदाराचे स्पष्टीकरण, म्हणाला दिल्लीपासून मुंबईपर्यंत...
sanjay dina patil
| Updated on: Feb 13, 2025 | 6:54 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे आधीच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता या सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांची हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांना जेवणाचे निमंत्रणही दिले होते. त्यातच ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे संजय दिना पाटील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यावर संजय दिना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे शिवसेना सोडून शिंदे गटात जाणार आहेत, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत. मात्र या केवळ अफवा असून त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण संजय दिना पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत अफवा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सदन मधील झालेल्या कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. शिवाय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या जेवणाचे निमंत्रणही स्वीकारले होते. राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षांतराला अधिकच बळ मिळाले. त्यामुळे दिल्लीपासून मुंबई पर्यंत अफवा सुरु होत्या.

चुकीचा अर्थ कोणी लावू नये

मात्र ही केवळ अफवा असल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे तसेच जेवणाचे निमंत्रण मिळाल्याने आपण त्या ठिकाणी गेलो होतो. त्याचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...