ठाण्यात समूह संसर्गाचा धोका, प्रसिद्ध हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोना

तसेच इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. (Thane Hotel Staff  Tested Corona Positive) 

ठाण्यात समूह संसर्गाचा धोका, प्रसिद्ध हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोना
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 11:56 PM

मीरा-भाईंदर : राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना ठाण्यात एका हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. मात्र एकाच हॉटेलमधील एवढे कर्मचाऱी पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. (Thane Hotel Staff  Tested Corona Positive)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी (18 फेब्रुवारी) या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी आल्यानंतर हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली.

या हॉटेलमधील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मीरा-भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल 4 मार्चपर्यंत सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे ही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत 26 हजार 665 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 25 हजार 516 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 802 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा आकडा वाढला 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलाय. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे.  (Thane Hotel Staff  Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

Corona Updates : महाराष्ट्रात कोरोना आलेख चढाच! दिवसभरात राज्यात 6 हजार 281 रुग्णांची भर, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.