ISC 12th exam 2022 : आयएससी बारावी परीक्षेत ठाण्याच्या लेकीचा बोलबाला, उपासना नंदी देशात पहिली

| Updated on: Jul 25, 2022 | 9:23 AM

Upasana Nandi : ठाण्याची उपासना नंदी देशात पहिली

ISC 12th exam 2022 : आयएससी बारावी परीक्षेत ठाण्याच्या लेकीचा बोलबाला, उपासना नंदी देशात पहिली
Follow us on

ठाणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या वतीने (ISC) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याच्या लेकीचा बोलबाला आहे. ठाण्यातील उपासना नंदी (Upasana Nandi) ही देशात अव्वल आली आहे. सिंघानिया स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. तिला 99.75 टक्के गुण मिळाले आहेत. बोर्डाचा बारावीचा महाराष्ट्राचा निकाल एकूण 99.76 टक्के इतका लागला आहे. तर राज्यातील 17 विद्यार्थी ऑल इंडिया गुणवत्ता यादीत चमकले आहेत. महाराष्ट्रातील एकूण 3 हजार 781 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 3 हजार 772 विद्यार्थी आयएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 1 हजार 762 मुले तर 1 हजार 10 मुली आहेत.

ठाण्याची उपासना देशात पहिली

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या वतीने (आयसीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याच्या लेकीचा बोलबाला आहे. ठाण्यातील उपासना नंदी ही देशात अव्वल आली आहे. सिंघानिया स्कूलची ती विद्यार्थिनी आहे. तिला 99.75 टक्के गुण मिळाले आहेत.

निकालाची टक्केवारी

बोर्डाचा बारावीचा महाराष्ट्राचा निकाल एकूण 99.76 टक्के इतका लागला आहे. तर राज्यातील 17 विद्यार्थी ऑल इंडिया गुणवत्ता यादीत चमकले आहेत. महाराष्ट्रातील एकूण 3 हजार 781 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 3 हजार 772 विद्यार्थी आयएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 1 हजार 762 मुले तर 1 हजार 10 मुली आहेत.

देश आणि विदेशातील मिळून एकूण 1128 शाळांमधील 96 हजार 940 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 हजार 761 मुले तर 45 हजार 579 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक आहे. एकूण 99.52 टक्के मुली तर 99.26 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. ठाण्यातील सिंघानिया स्कूलच्या भाग्यश्री सिसोदियाने देशात दुसरा तर ध्रुवी पंड्याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

राज्याचा निकाल 99.76 टक्के

महाराष्ट्रातील एकूण 3 हजार 781 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 3 हजार 772 विद्यार्थी आयएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 1 हजार 762 मुले तर 1 हजार 10 मुली आहेत.