एकट्या ठाण्यात तब्बल 3500 पंकज, सुरेश आणि रमेश… शंभरी गाठलेलेही शेकड्यात… आणखी एक दुबार नावांचा घोळ उघड

ठाण्याच्या एकूण ३३ प्रभागात तब्बल ६७ हजार ५०८ दुबार मतदार आहेत. याचे पुरावेच विचारे यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिले. तसेच ठाण्याच्या मतदार यादीत तब्बल साडेतीन हजार पंकज, सुरेश आणि रमेश अशी एकेरी अनेक नावे आहेत. मात्र त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद नाही.

एकट्या ठाण्यात तब्बल 3500 पंकज, सुरेश आणि रमेश... शंभरी गाठलेलेही शेकड्यात... आणखी एक दुबार नावांचा घोळ उघड
Voting
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
Updated on: Dec 03, 2025 | 4:58 PM

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीचे मतदान काल झाले.सकाळी सात वाजल्यापासून मतरदांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आज निवडणूक आयोगाच्या ‘बोगस’ मतदार याद्यांचा पर्दापाश ठाकरे गटाने केला आहे. ठाण्याच्या मतदार यादीत तब्बल साडेतीन हजार पंकज, सुरेश आणि रमेश अशी एकेरी अनेक नावे आहेत. मात्र त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद नाही. हे कोण लोक आहेत? असा सवाल ठाकरे गट शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

ठाण्याच्या एकूण ३३ प्रभागात तब्बल ६७ हजार ५०८ दुबार मतदार आहेत. याचे पुरावेच विचारे यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना दिले. या सदोष प्रारूप याद्या तत्काळ दुरुस्त कराव्यात, अन्यथा ठाकरे गट शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. एकाच मतदाराचे नाव अनेक प्रभागात, पण वय वेगळे आणि ईपीआयसी नंबर भलतेच असल्याचे निदर्शनास आले.

काहींचे फोटो अस्पष्ट

शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ५६२ मतदार यादी सापडले. १३ हजार ८११ मतदारांच्या फोटोंचा लोच्या. काहींचे फोटो अस्पष्ट तर अनेकांचे फोटोचे रकानेच रिकामे आहेत. पुरुषांच्या नावासमोर स्त्रीलिंगी असा उल्लेख आणि ईपीआयसी क्रमांकही वेगळे असल्याचे दिसले. अनेक मतदारांचे यादीत फक्त फोटो आहेत, पण त्यासमोर त्यांचे नावच छापलेले नाहीत. अनेक मतदारांची नावे त्यांच्या आईपेक्षा तब्बल 52 वर्षांनी जास्त असल्याचे दिसत आहे.

30 हजार पेक्षा जास्त दुबार मतदार

मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत सर्वांत जास्त दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत 30 हजार पेक्षा जास्त दुबार मतदार असल्याच्या समोर आले. 30 हजार दुबार मतदार आणि मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांचे नाव बंगालीत. तर त्यांच्या बहिणीचं नाव मुस्लिम केल्यामुळे अंधेरी पश्चिमेत मनसे आक्रमक झाली आहे. 7 दिवसात मतदार यादी पुन्हा दुरुस्त करून 30 हजार दुबार मतदार नाव काढण्यात यावा, त्यासोबत मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांच्या बहिणीच्या नाव पुन्हा दुरुस्त करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.