मृत्यू काही क्षणांच्या अंतरावर, ‘या’ निर्णयानं जीव बचावला, माळशेज घाटातील अंगावर काटा आणणारी घटना

मुरबाड माळशेज घाटात असलेल्या शिव मंदिराच्या पुढे बोगद्याजवळ एका कारवर दरड कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला.

मृत्यू काही क्षणांच्या अंतरावर, 'या' निर्णयानं जीव बचावला, माळशेज घाटातील अंगावर काटा आणणारी घटना


ठाणे : मान्सूनच्या आगमनासोबत राज्यात सर्वत्र धोधो पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक दुर्घटनाही घडताना पाहायला मिळत आहेत. त्यातच सलग 2 दिवस पडत आलेल्या संथधार पावसाने माळशेज घाट खचलाय. 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास मुरबाड माळशेज घाटात असलेल्या शिव मंदिराच्या पुढे बोगद्याजवळ एका कारवर दरड कोसळल्याने गाडीचा चक्काचूर झाला. विशेष म्हणजे योगायोगाने या अपघातात कारचे मालक विजय रत्नाकर म्हात्रे (रा. अहमदनगर) बचावले आहेत (Accident in Malshej ghat murbad due to land sliding amid rain).

गाडी मालक विजय म्हात्रे प्रवास करत असताना ते मुरबाड घाटात बोगद्याजवळ थांबले. त्यांनी आपली गाडी थांबवून लघुशंखेसाठी बाजूला गेले. त्याचवेळी अचानक गाडीवर दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 4 व्हिलरवर दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. त्यात मोठं-मोठे दगड गाडीवर पडल्याने गाडीचा जागीच चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा :

VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, टँकरमधून केमिकल गळती, वाहने घसरल्याने वाहतूक विस्कळीत

रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Thane Hospital Fire: मुंब्य्रातील रुग्णालयात आग; ICU वॉर्डमधील चार रुग्णांचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ पाहा :

Accident in Malshej ghat murbad due to land sliding amid rain