रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

वर्ध्याच्या दहेगाव येथील शिवारात शुक्रवारी (4 जून) भीषण अपघात घडला (Mandal officer death in accident at Wardha Dahegaon)

रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

वर्धा : रस्त्याने गाडी चालवताना शक्यतो नियंत्रित वेगातच गाडी चालवावी. कारण अतिवेगाने गाडी चालवल्यास आपला त्या गाडीवरील ताबा सुटतो आणि अनपेक्षित अशी दुर्घटना घडते. अशीच एक अनपेक्षित आणि दुर्देवी घटना वर्ध्यात घडली आहे. वर्ध्याच्या दहेगाव येथील शिवारात शुक्रवारी (4 जून) भीषण अपघात घडला. या अपघातात एका मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले (Mandal officer death in accident at Wardha Dahegaon).

नेमकं काय घडलं?

मंडळ अधिकारी बाबाराव हिम्मत पांडे (56), सुनील नारायण घोडे, सुयोग ओमप्रकाश कांबळे आणि मोहम्मद शफी शेख इसुफ हे चौघे शुक्रवारी रात्री कारने वायफडकडून दहेगावकडे जात होते. रस्त्याने फारशी गाड्यांची गर्दी नव्हती. त्यामुळे गाडी वेगात होती. मात्र, दहेगाव येथील एका शिवारात वळण रस्ता आला. गाडी भरधाव वेगाने असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट पुलावरुन खाली कोसळली (Mandal officer death in accident at Wardha Dahegaon).

मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू, इतर जखमी

या अपघातात मंडळ अधिकारी बाबाराव पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील घोडे आणि सुयोग कांबळे हे गंभीर जखमी झाले. तसेच मोहम्मद शफी शेख इसुफ हे किरकोळ जखमी झाले. संबंधित घटना तेथील स्थानिक रहिवासी उषा दाते यांच्या शेताजवळ घडली. घटना घडल्यानंतर काही स्थानिक तिथे आले. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली.

पोलीस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेलं. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला.

हेही वाचा : VIDEO : नाशिकमध्ये गुंडगिरी, भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला, सीसीटीव्हीत घटना कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI