
निनाद करमरकर, TV9 मराठी, अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnarth) व्यायामशाळेत भलामोठा साप (Huge Snake) आढळून आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सकाळी व्यायाम करणाऱ्यासाठी आलेले तरुण सापाला पाहून धास्तावले होते. अखेर सर्पमित्राला बोलावून या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मात्र या सापाला पकडेपर्यंत जीममध्ये असलेल्या खेळाडूंना व्यायामाआधीच (Gym) घाम फुटला होता.
अंबरनाथच्या शिवगंगा परिसरात अंबरनाथ नगरपालिकेची व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेत आज सकाळच्या सुमारास खेळाडू व्यायाम करत होता. त्यावेळी त्यांना काहीतर सरपणारा प्राणी दिसला. खेळाडूंना प्रसंगावधान राखत थोडं निरखून पाहिलं तर तो भरामोठा साप असल्याचं दिसून आलं.
अंबरनाथच्या जीममध्ये आढळला भलामोठा साप! सापाला पाहून व्यायामाआधीच तरुणांना फुटला घाम, (व्हिडीओ – निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ) pic.twitter.com/fb02oiKOAS
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 17, 2022
पालिकेच्या व्यायामशाळात साप आढळ्यामुळे व्यायामशाळेतील तरुणांनी स्थानिक नगरसेवकाला याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र गोहिल यांना तिथे पाचारण करण्यात आलं. गोहिल यांनी तिथं येऊन 6 फूट लांब धामण जातीच्या या बिनविषारी सापाला पकडलं.
सापाला पकडेपर्यंत तरुणांची एकच घाबरगुंडी उडाली होती. तब्बल 6 फूट लांब धामण जातीचा हा बिनविषारी साप होता, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली. या सापाला पकडताना व्हिडीओ देखील तरुणांनी काढला. साप पकडल्यानंतर व्यायामशाळेतील सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. पण तोपर्यंत सगळ्यांची दैना उडाली होती.
अनेकदा साप आढळला की तो विषारी आहे, असं समजून सापाला मारलं जातं. पण तसं न करता सापाला घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्राणीप्रेमींकडून करण्यात आलंय. धामण हा सर्रास आढळून येणारा साप आहे.
लोकांच्या मनात असलेल्या भीतीनं अनेकदा धामण जातीच्या सापाची शिकार होते, असं पाहण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना याबाबतची माहिती द्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.