VIDEO | धक्का लागल्याचे निमित्त, तरुणावर जीवघेणा हल्ला, गावगुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Nov 07, 2021 | 5:12 PM

ज्या कमल कजानिया याच्यावर हल्ला झाला, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विनयभंग, मारहाण, जबरी चोरी, दरोडा असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.

VIDEO | धक्का लागल्याचे निमित्त, तरुणावर जीवघेणा हल्ला, गावगुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
धक्का लागल्याचे निमित्त, तरुणावर जीवघेणा हल्ला
Follow us on

उल्हासनगर : धक्का लागल्याच्या कारणावरुन उल्हासनगरात गावगुंडांनी भररस्त्यात नंग्या तलवारी नाचवत हैदोस घातल्याची घटना उघडकीस आली आहे. हैदोस घालत एका तरुणावरही या गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कमल कजानिया असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.

कमल कजानिया हा तरुण शुक्रवारी रात्री सेक्शन 17 मध्ये चहा पिण्यासाठी आला होता. याचवेळी कमलचा एक तरुणाला चुकून धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून गावगुंडांच्या टोळक्याने थेट नंग्या तलवारी नाचवत कमल याच्यावर हल्ला चढवला. या घटनेत कमल हा गंभीर जखमी आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी फक्त मारहाणीचा किरकोळ स्वरूपाचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय.

उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

उल्हासनगरात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतंय. उघडपणे गावगुंड तलवारी, घातक हत्यारे खुलेआम नाचवताना दिसतात. क्षुल्लक कारणावरुन जीवघेणे हल्ले करणे यासारख्या घटना वारंवार घडताना दिसतात. कायद्याने गुन्हा असतानाही तरुण हातात हत्यारे घेऊन फिरताना दिसतात. पोलीस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे गुंडांचा हैदोस वाढल्याचे दिसतेय.

जखमी तरुणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या कमल कजानिया याच्यावर हल्ला झाला, तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर विनयभंग, मारहाण, जबरी चोरी, दरोडा असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कमल हा मद्यधुंद अवस्थेत होता, त्याने तिथे असलेल्या काही जणांना शिवीगाळ केल्यानेच पुढील प्रकार घडल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

इतर बातम्या

चोरट्यांचा दिवाळीबारः नाशिकमध्ये घरफोडी करून मोत्याचा हार, सोन्या-चांदीचे दागिने, ताट-वाट्या लंपास

Iraq Attack: इराकचे पंतप्रधान ‘हत्येचा प्रयत्नातून’ बचावले; अमेरिकेने हल्ल्याचा केला निषेध