AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iraq Attack: इराकचे पंतप्रधान ‘हत्येचा प्रयत्नातून’ बचावले; अमेरिकेने हल्ल्याचा केला निषेध

इराकी सैन्याने म्हटले आहे की बगदादमधील त्यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला गेला आणि हा हल्ला पंतप्रधान कादिमी यांच्या हत्येचा प्रयत होता.

Iraq Attack: इराकचे पंतप्रधान 'हत्येचा प्रयत्नातून' बचावले; अमेरिकेने हल्ल्याचा केला निषेध
Iraq Prime Minister Mustafa al-Kadhimi
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 3:56 PM
Share

बगदाद: इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी (Mustafa al-Kadhimi) यांच्या घरावर रविवारी रॉकेट हल्ला झाला. इराकी सैन्याने म्हटले आहे की बगदादमधील त्यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला केला गेला आणि हा हल्ला पंतप्रधान कादिमी यांच्या हत्येचा प्रयत होता. या हल्ल्यात कादिमीला कोणतीही हानी झाली नाही आणि त्यांची तब्येत चांगली आहे, असे लष्कराने सांगितले. (Iraq Prime minister survived a failed attempt of assassination after drone attack with explosives)

हल्ल्यानंतर कादिमी यांनी ट्विटरवर सांगितले की, मी ठीक आहे आणि जनतेला शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “विश्वासघाताचे रॉकेट आस्तिकांना निराश करणार नाही… आमच्या वीर सुरक्षा दलांची दृढता आणि जिद्द कमी पडणार नाही कारण ते लोकांची सुरक्षा करतात, न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काम करतात. मी इराकच्या भल्यासाठी सर्वांकडून शांतता आणि संयम ठेवण्याचे आवाहन करतो,” कादिमी पुढे म्हणाले.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनी स्वीकारलेली नाही.

अमेरिकेने हल्ल्याचा केला निषेध

अमेरिकेने इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधिमी यांच्यावर ड्रोन हल्ल्याचा निषेध केला, आणि “दहशतवादाचे उघड कृत्य” आहे असं म्हटलं. दहशतवादाचे हे उघड कृत्य आहे, ज्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. इराकच्या सर्वात महत्तवाच्या स्थानी हा हल्ला होता, ”राज्य विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले.

दरम्यान, बगदादमधील ग्रीन झोनजवळ जोरदार गोळीबार झाल्याचं वृत्त अल अरेबियाने दिलं आहे, जिथे कादिमींचे घर, अमेरिकेचे दूतावास आणि इतर महत्तवाचे कार्यालय आहेत. शनिवारपासून इराण समर्थक हशेद अल-शाबी शिया यांच्या समर्थकांनी गेल्या महिन्याच्या निवडणुकीच्या निकालांविरुद्ध निदर्शने केली आणि ग्रीन झोनच्या एका गेटच्या बाहेर तळ ठोकला आहे.

Other News

भारत-पाक युद्धात सहभागी नांदेडच्या माजी सैनिकाचा खून, मुलगा-सून-नातवाने संपवलं

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या

सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.