AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : ‘शाळेतील दादाने माझे कपडे…’; बदलापूरमधील पीडित चिमुकलीने सांगितलं शाळेत काय घडलं!

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. मंगळवारी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी करत बदलापूरकर थेट रेल्वे स्टेशनवर उतरले होते. तब्बल आठ तास सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी मोडून काढलं. चिमुकलींना किती त्रास झाला असेल याचा कोणी विचार करू शकत नाही. आरोपीचं नाव घेत पीडित चिमुकलीने काय घडलं ते सांगितलं.

Crime : 'शाळेतील दादाने माझे कपडे...'; बदलापूरमधील पीडित चिमुकलीने सांगितलं शाळेत काय घडलं!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 20, 2024 | 8:43 PM
Share

महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथे आदर्श शाळेमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी बदलापूरकरांनी थेट स्टेशनमध्ये जात ठिय्या दिला होता. मंगळवारी सकाळपासून सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी संध्याकाळी मोडून काढलं. पोलिसांनी ट्रॅकवरून बाजूला होण्याची विनंती केली होती. मात्र ते काही हटले नाहीत, शेवटी पोलिसांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं. या प्रकरणामध्ये पीडित मुलींच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील समोर आला आहे.

पीडित मुलीने 16 ऑगस्टला शाळेमध्ये जाण्यास नकार दिला होता. घरच्यांनी सांगितल्यानुसार ती शाळेत जायचं म्हटलं की प्रचंड घाबरली होती. प्राईव्हेट पार्टच्या ठिकाणी तिला त्रास होत असल्याचं तिने घरी सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी तिला दवाखान्यात नेलं, त्यावेळी डॉक्टरांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती दिली. एफआयरनुसार चिमुकलीवर 13 ऑगस्टला सकाळी 9 ते 12 च्या सुमारास हा प्रकार चिमुकलीसोबत घडला होता. याआधी एका पालकांनी तक्रार दाखल केली होती.

एका पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, शाळेतील दादाने कपडे काढून प्रायव्हेट पार्टला हात लावला. सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे याने याच्यावर पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमे लावत गुन्हा दाखल केला आहे. शाळा प्रशासन आणि पोलिसांना या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने लोकांनी एकत्र येत बदलापूर बंद ठेवण्याची घोषणा केली.

पीडित कुटूंबाची तब्बल 12 तास तक्रार नोंदवली गेली नव्हती.  मंगळवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वांना रेल्वे स्टेशनच्या पटरीवर ठिय्या आंदोलन केलं. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांंचे तत्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी