कल्याणमध्ये अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विरोधात भाजपचे आंदोलन, आमदार गायकवाडांची पोलिसांवर जोरदार टीका

| Updated on: Oct 05, 2021 | 4:56 PM

रात्री मद्यधुंद अवस्थेत नशेच्या अमलाखाली तरुणांच्या टोळ्या नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत. हातात तलवार घेऊन नाचणे, नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, दारू पिऊन गाड्यांची तोडफोड करणे, गाड्यांची जाळपोळ अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने घडत आहेत.

कल्याणमध्ये अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विरोधात भाजपचे आंदोलन, आमदार गायकवाडांची पोलिसांवर जोरदार टीका
कल्याणमध्ये अमली पदार्थ आणि गुन्हेगारी विरोधात भाजपचे आंदोलन
Follow us on

कल्याण : कल्याणमध्ये अमली पदार्थांची विक्री वाढली आहे. नशेमुळे गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांचा मित्र आहे. गुन्हेगारांसोबत दारू पितात तर गुन्हेगारी थांबणार कशी, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांवर केली आहे. अंमली पदार्थांमुळे वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात कल्याणमध्ये भाजपकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. हे सर्व थांबले नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी दिला आहे. (BJP’s agitation against drugs and crime in Kalyan, MLA Gaikwad strongly criticizes the police)

टीव्ही 9 च्या बातमीचा इम्पॅक्ट

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण पूर्वेत गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झाली आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेत नशेच्या अमलाखाली तरुणांच्या टोळ्या नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत. हातात तलवार घेऊन नाचणे, नागरिकांना विनाकारण मारहाण करणे, दारू पिऊन गाड्यांची तोडफोड करणे, गाड्यांची जाळपोळ अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने घडत आहेत. या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यात कोळसेवाडी पोलीस अपयशी ठरल्याचे या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येते. कल्याण पूर्वमधील नागरिक या वाढत्या घटनांमुळे दहशतीच्या सावटाखाली आहेत. शिवाजी कॉलनी परिसरात दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली ही बातमी टीव्ही 9 ने दाखवली. बातमीची दखल घेत आज भाजपतर्फे आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी पोलिसांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले गणपत गायकवाड?

अमली पदार्थांची लागलेली किड फक्त पोलीस संपवू शकतात. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे गुन्हेगारांसोबत असतात त्यांच्यासोबत दारू पितात. तरुण नशेच्या आहारी जात आहेत. अमली पदार्थांची विक्री थांबविण्यासाठी आज मोर्चा काढला होता. पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवले नाही तर व्यापक आंदोलन करू, सर्वसामान्यांची पोलिस ठाण्यात तक्रार घेतली जात नाही. गुन्हेगारांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. सरकारने पोलीस ठाण्यात कर्मचारी वसुलीसाठी ठेवले आहेत. त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री थांबविण्याचे काम करून घ्या, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

औरंगाबादमधील माळीवाड्यातील पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीवर मोक्कानुसार कारवाई

शहरातील माळीवाडा येथील हर्ष पेट्रोल पंपावर (Harsh Petrol pump) बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखासह दोन जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी घेतला आहे. या टोळीतील दोन आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad Police) ताब्यात आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. माळीवाडा येथील पेट्रोल पंप लुटणाऱ्या टोळीचा प्रमुख नवप्रीतसिंग तेरेसमसिंग ऊर्फ मनदीपसिंग सुरजितसिंग जाट याच्यावर पंजाबमधछ्ये 19 गंभीर गुन्ह्यांचे खटले सुरु आहेत. त्याचा साथीदार मोहितवर महाराष्ट्रात 6 गुन्ह्यांचे खटले सुरु आहेत. तसेच इतरही अनेकगुन्ह्यांमध्ये हे आरोपी वाँटेड असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (BJP’s agitation against drugs and crime in Kalyan, MLA Gaikwad strongly criticizes the police)

इतर बातम्या

BMC Recruitment 2021: मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती, 45 हजारांपर्यंत पगाराची संधी

भारताचे नवे सोने विनिमय कसे कार्य करेल? तुम्ही अशा प्रकारे ट्रेडिंग करू शकता