मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करा, नाशिकमधल्या कार्यालयांना आदेश

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 सादर करावे, असे निर्देश कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अलका तडवी यांनी दिले आहेत.

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करा, नाशिकमधल्या कार्यालयांना आदेश
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:44 PM

नाशिकः सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 सादर करावे, असे निर्देश कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अलका तडवी यांनी दिले आहेत.

सहायक आयुक्तांनी कळविल्याननसार, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच व्यापार खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यवसाय कारखाने या आस्थापनांनी माहे सप्टेंबर तिमाही अखेर 30 दिवसांच्या आत विवरणपत्र सादर करावे. त्या अनुषंगाने सेवायोजन कार्यालये रिक्तपदांची सुचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनुसार वरीलप्रमाणे सर्व आस्थापनांनी वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळांची माहिती ई-आर-1 विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र सादर करण्याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत (0253) 2972121 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पॅनदेखील बरेच काही सांगते

पॅन किंवा कायम खाते क्रमांक एक 10 अंकी क्रमांक आहे, जो आपली आर्थिक स्थिती दर्शवितो. त्याच वेळी पॅन कार्डवर लिहिलेल्या नंबरमध्ये बरीच माहिती लपलेली आहे आणि यावरून आपल्याबद्दल बरेच काही ज्ञात होते. प्राप्तिकर विभागाच्या मते, कोणत्याही पॅनचे पहिले तीन अंक इंग्रजीच्या वर्णमाला मालिकेचे प्रतिनिधित्व करतात. या वर्णमाला मालिकेत, AAA ते ZZZ पर्यंत इंग्रजीची कोणतीही तीन अक्षरे मालिका असू शकतात, याचा निर्णय आयकर विभागाने घेतलाय. पॅन कार्डवर प्रविष्ट केलेले चौथे अक्षर आयकरदात्याची स्थिती दर्शवितो. नंबरवर P असल्याने हे पॅन नंबर वैयक्तिक असल्याचे दर्शवते म्हणजे एका व्यक्तीचा आहे. F ही संख्या काही फर्मशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे C सूचित करते, AOP ने असोसिएशन ऑफ पर्सन, T से ट्रेस्ट, H अविभाजित हिंदू कुटुंबाचा अर्थ दर्शवते, B व्यक्तीच्या ऑफ इंडिविजुअलचे प्रतिनिधित्व करते, L स्थानिक सूचित करते, J कृत्रिम न्यायालयीन व्यक्तीला सूचित करते, G सरकारला सूचित करते. आयकर भरण्यासाठी याचा वापर केला जातो.

इतर बातम्याः

जरा विसावू या वळणावर; रोमँटिक कपल जेनेलिया-रितेशची नाशिकला भेट!

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.