जरा विसावू या वळणावर; रोमँटिक कपल जेनेलिया-रितेशची नाशिकला भेट!

रोमँटिक कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी निसर्गरम्य नाशिकला भेट दिली.

जरा विसावू या वळणावर; रोमँटिक कपल जेनेलिया-रितेशची नाशिकला भेट!
अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी नाशिकला भेट दिली.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:13 PM

नाशिकः रोमँटिक कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी निसर्गरम्य नाशिकला भेट दिली.

जेनेलिया आणि रितेश हे एकदम हटके कपल. ते दोघेही सतत सोशल मीडियावर अपडेट असतात. एकमेकांचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. रितेशने मराठी सिनेमा काढला की त्यात जेनेलियाची भूमिका नसते. मात्र, तिचे त्या चित्रपटात एक तरी गाणे असतेच. या दोघांनीही पहिल्यांदा ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात 2003 मध्ये एकत्र काम केले. आणि तेव्हापासूनच या दोघांची हटके लव्ह स्टोरी सुरू झाली. कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, पार्टी की लातुरातली राजकीय धूळवड. या प्रत्येक ठिकाणी हे जोडपे एकत्र हजर असते. मग नाशिकच्या दौऱ्यात तरी ते एकटे कसे असतील. त्या दोघांनी नाशिकला जोडीने भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत रितेशचे सासरे नील डिसूजा आणि सासूबाई जेनीती डिसूजाही उपस्थित होत्या. या साऱ्यांनी नाशिकच्या बाल येशू मंदिराला भेट दिली. या ठिकाणी प्रार्थना केली. फादर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. डिसूजा परिवार या सुप्रसिद्ध धार्मिक स्थळी नियमित येतात. यापूर्वी करीना आणि करिष्मा कपूरनेही यापूर्वी बाल येशू मंदिराला भेट दिली होती.

येथे आहे बाल येशू मंदिर?

नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स हायस्कूलजवळ हे बाल येशू मंदिर आहे. देशातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थळात याची गणना केली जाते. या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. त्यासाठी देश-विदेशातून लोक हजेरी लावतात. अनेक भाविक दिल्ली, मुंबई आणि पुण्याहून नेहमी येथे येतात. त्यात प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असतो. मात्र, बहुतांश जणांचे दौरे हे गुप्त असतात.

साक्षी मलिक सुला विनयार्डमध्ये अभिनेत्री साक्षी मलिकनेही नाशिकला भेट दिली. साक्षीने नाशिक जवळच्या सुला विनयार्डमध्ये आपली सुट्टी साजरी केली. यावेळी तिच्यासोबतचा तिचा पती आणि व्यावसायिक संतुल कटाहरा होता. सुला विनियार्डमध्ये द्राक्षापासून वाइनची निर्मिती केली जाते. येथेच जगप्रसिद्ध सुला फेस्टचेही आयोजन केले जाते. देश-विदेशातील अनेक सेलिब्रेटी नाशिकच्या सुला विनियार्डमध्ये आवर्जुन हजेरी लावतात.

इतर बातम्याः

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’

आमच्याकडे टोल नाक्यांवर तर काय-काय चालतं; भुजबळांची शिवसेना आमदार कांदेंवर शेलकी टीका

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.