AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train Update : सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, VIDEO

Central Railway Train update : कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. अगदी भल्या पहाटे कार्यालय गाठण्यासाठी लोक आपलं घर सोडतात. त्यामुळे दिवसाच वेळापत्रक बिघडलं.

Mumbai Local Train Update : सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, VIDEO
Mumbai LocalImage Credit source: tv9
| Updated on: Aug 29, 2023 | 10:07 AM
Share

कल्याण : लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. 70 लाखापेक्षा जास्त नागरिक लोकलचा वापर करतात. लोकलच्या वेळेवर बरच काही अवलंबून असतं. ठरलेली लोकल चुकली, की अनेकांच दिवसाच वेळापत्रक बिघडतं. नोकरदारांसाठी लोकलची वेळ खूप महत्त्वाची असते. सकाळी कामावर निघण्याच्यावेळी किंवा संध्याकाळी कामावरुन निघाल्यानंतर लोकल सेवा कोलमडली, तर प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी, रेटारेटी, जीव अगदी नकोसा होतो.

त्यामुळे मुंबई लोकल ठरलेल्या वेळापत्रकानुसार चालण खूप गरजेच आहे. सेंट्रल म्हणजे मध्य रेल्वे मार्गावर कर्जत-कसारा मार्गावरुन दरररोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अगदी भल्या पहाटे कार्यालय गाठण्यासाठी लोक आपलं घर सोडतात. सकाळी 4 वाजल्यपासूनच ट्रेन प्रवाशांची भरलेली असती. अगदी रात्री उशिरापर्यंत तुम्हाला लोकलमध्ये प्रवाशांची वर्दळ दिसेल.

नोकरदारांचे प्रचंड हाल

दरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वे कोलमडली. मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. खासकरुन कल्याणच्या पुढून येणाऱ्या प्रवाशांना जास्त मनस्ताप झाला. त्यांना ठरलेल्या वेळेत कार्यालय गाठता आलं नाही. कुठे झाला सिग्नल यंत्रणेत बिघाड

त्यामुळे दिवसाच वेळापत्रक बिघडलं. कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 व 7 च्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अर्धातास उशिराने धावत आहेत. परिणामी कल्याण आणि त्यापुढच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.