अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, ठाणे महापालिका ऑन अ‍ॅक्शन मोड

ठाणे महापालिका आयुक्तांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत (Disaster management cell set up in the wake of heavy rains from Thane Municipal Corporation).

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, ठाणे महापालिका ऑन अ‍ॅक्शन मोड
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 6:21 PM

ठाणे : हवामान विभागाने मुंबई, कोकणासह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार ठाण्यात 9 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा स्वत: रस्त्यावर उतरुन कामांची पाहणी करत आहेत. नुकतंच त्यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. तसेच त्यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत (Disaster management cell set up in the wake of heavy rains from Thane Municipal Corporation).

प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

मान्सून कालावधीत प्रत्येक प्रभाग समितीनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार आता प्रभाग समिती स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे (Disaster management cell set up in the wake of heavy rains from Thane Municipal Corporation).

पावसाच्या पार्श्वभूमीवर महापिलाका सतर्क

मान्सून कालावधीत झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, भुस्खलन होणे आदी घटना घडू शकतात. अशावेळी नागरिकांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रभाग समिती स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षात तीन सत्रामध्ये मनुष्यबळ आणि मशीनरी तैनात करण्यात आली आहेत. या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले असून नागरिकांनी त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या नंबरवर फोन करावा :

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत टोल फ्री – १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन – ०२२ २५३७१०१० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नौपाडा – कोपरी प्रभाग समिती- २५३२५१६६/२५३३४४७१, उथळसर प्रभाग समिती- २५४७३५६८/२५४७३५४१, वागळे इस्टेट प्रभाग समिती- २५८२६८ ९ १ / २५८२६८ ९ ०, लोकमान्य – सावरकरनगर प्रभाग समिती- २५८८५०४३/२५८८५८०१, वर्तकनगर प्रभाग समिती- २५८८५८०१/२५८८५०४३, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती- २५४४७२२०/२५४०२३७५, आणि कळवा प्रभाग समिती- २५४१०४७० या क्रमांकावर संपर्क साधावा.

तसेच जवाहर बाग अग्निशमन १०१/२५३३१६००/२५३६५२०२/ २५३३४२१६, कोपरी अग्निशमन केंद्र २५३२५३१३, वागळे इस्टेट अग्निशमन केंद्र २५८२३४७७/ २५८२३५४७/२५८२०६६०, बाळकूम अग्निशमनकेंद्र २५३६६७०२/ २५३६३१०१/ २५३६६४०१, मुंब्रा अग्निशमन केंद्र २५४६२४२४/ २५४६२४४४, पांचपाखाडी अग्निशमन केंद्र २५३३१३ ९९ / २५४४०७ ९९ / २५४४०७ ९८, रुस्तमजी अग्निशमन केंद्र २५४४००२० शिळ अग्निशमन केंद्र ७३०५ ९ ३ ९ १०१ / ७३०४४ ९ ३१०१, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन १०७७ / २५३८१८८६ / प्राधिकरण , ठाणे २५३०१७४० / फॅक्स -२५३४ ९ २००, ठाणे पोलिस नियंत्रण कक्ष २५४४२१२१/२८२८/३५३५/३६३६ आणि शहर वाहतुक नियंत्रण कक्ष ८२८६३००३००/४०० ४०० २५४०१०५६ या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका

उद्या 9 जून ते 12 जून या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ठाणे शहर लेव्हल 2 मध्ये आले आहे. तरी देखील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे,

हेही वाचा : हवामान विभागाकडून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा, ठाण्यात यंत्रणा सज्ज, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.