मलंगगड परिसरात उल्हासनगरचं डम्पिंग येणार, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांसह आमदारांचा विरोध

उल्हासनगर महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड मलंगगड परिसरातील उसाटणे गावाजवळ येणार आहे. या डम्पिंगच्या जागेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला

मलंगगड परिसरात उल्हासनगरचं डम्पिंग येणार, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांसह आमदारांचा विरोध
डम्पिंग ग्राऊंडला स्थानिकांसह आमदार गायकवाड यांचा विरोध
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 7:53 AM

उल्हासनगर :  उल्हासनगर महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड मलंगगड परिसरातील उसाटणे गावाजवळ येणार आहे. या डम्पिंगच्या जागेच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला, तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनीही या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. सत्तेचा माज आला असेल, तर मी माज काढेन, अशा शब्दात गायकवाड यांनी आपला रोष व्यक्त केला.

उल्हासनगरला स्वतःचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड नाही, उसाटणे गावजवळ चाचपणी

उल्हासनगर शहराला स्वतःचं अधिकृत डम्पिंग ग्राउंड नसून सध्या गायकवाड पाडा भागातल्या खदाणीत अवैधरित्या कचरा टाकला जातो. या ठिकाणचीही क्षमता आता संपली असून त्यामुळे शासनाने मलंगगड परिसरातील उसाटणे गावजवळची जागा उल्हासनगर महापालिकेला डम्पिंगसाठी दिली. मात्र या डम्पिंगला स्थानिकांनी विरोध दर्शवला.

स्थानिकांसह आमदारांचाही विरोध, अधिकाऱ्यांना रोषाला सामोरं जावं लागलं

यानंतर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिका आणि गावकरी यांची एकत्र बैठक घेत तोडगा काढण्याची तयारी दर्शवली. मात्र तरीही उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी या डम्पिंगच्या जागेची मोजणी करण्यासाठी पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. याचवेळी तिथे आलेल्या आमदार गणपत गायकवाड यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.

उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दडपशाही, मात्र माज आला असेल तर मी उतरवेन!

आपलं आयुक्तांशी बैठकीबाबत बोलणं झालेलं असतानाही अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येणं चुकीचं असल्याचं आमदार गायकवाड म्हणाले. ज्याठिकाणी डम्पिंगला जागा दिली आहे तिथून 50 मीटरवर शाळा असून तिथे आजूबाजूच्या गावातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे डम्पिंग अन्यत्र हलवण्याची स्थानिकांची मागणी आहे. मात्र उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी दडपशाही करत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

(Dumping of Ulhasnagar will come in Malanggad area, MLA Ganpat Gaikwad and villagers oppose)

हे ही वाचा :

राज्यातील 11 जिल्ह्यांवर लॉकडाऊनचं संकट?, कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Unlock : 22 जिल्ह्यातले निर्बंध हटवले, नवी नियमावली जारी, काय सुरु, काय बंद? वाचा एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.