“मी कुठलीही केस घ्यायला तयार;” जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना वगळण्यात आलेलं नाही. उद्याच्या दौऱ्यात वक्त्यांची जास्त यादी होती. पुढच्या सर्व दौऱ्यात अमोल मिटकरी हे आमच्या बाजूनं असतील, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

मी कुठलीही केस घ्यायला तयार; जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:37 PM

ठाणे : ३५४ केस माझ्याविरोधात टाकली ना. त्यानंतर मी कुठलीही केस घ्यायला तयार आहे. माझी बदनामी केलीत ना, असा असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्यावर केस टाकून आम्ही जितेंद्र आव्हाडला (Jitendra Awad) अटकवू शकतो. कार्यकर्त्यांना घाबरावयाचं होतं ना. मला आतमध्ये फसवायचं होतं ना. मग, कार्यकर्ते (activists) आमच्यासमोर काय आहेत, हे दाखविण्याचा तो प्रयत्न होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केला.

मला अडकविण्यासाठी तुम्ही कशा-कशाचा वापर करता हे बघुया ना.याद रखना सिकंदर के होसले तो भारी थे. जब गया था दुनिया से तो दोनो हात खाली थे, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. कोण थांबवितं, कोण पायात पाय घालतं ते सर्व बघू. रणांगणात लढाईला उतरलो आहोत. मग, लढाईचे परिणाम भोगायचे असतात, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

असल्या गोष्टींची राजकारणात चर्चा होत नसते

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा सामाजिक चर्चेचा विषय आहे का? कुणाचंही सामाजिक आयुष्य असतं. आपण किती खालच्या दर्जावर जाणार आहोत. बहुजन नेते कसे बदनाम होतात. असल्या गोष्टींची राजकारणात चर्चा होत नाही. शिसे के घर में रहा करते हैं वो दुसरों के घरो पर पत्थर नहीं फेका करते, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.

सामाजिक जीवन वेगळं

सामाजित जीवन वेगळं असतं. तुम्ही ऐतिहासिक विषयांना स्पर्श करता तेव्हा तुमचं राजकीय जीवन वेगळं होतं. आम्ही एका राजकीय पक्षात आहोत. पण, आमचं सामाजिक जीवन वेगळं असू शकतं. कुणी नाना धर्माधिकारी यांना मानत असेल तर कुणी दुसऱ्याला मानू शकतात. वेगवेगळे विचार आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अमोल मिटकरी यांना वगळलं का?

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना वगळण्यात आलेलं नाही. उद्याच्या दौऱ्यात वक्त्यांची जास्त यादी होती. पुढच्या सर्व दौऱ्यात अमोल मिटकरी हे आमच्या बाजूनं असतील, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.