AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Restraining Order : ठाणे जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

बॅनरबाजी, घोषणाबाजी, काळे फासणे आदी प्रकार शिवसैनिकांकडून होत आहेत. तसेच आणखी वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी म्हणून ठाणे जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

Thane Restraining Order : ठाणे जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
ठाणे जिल्ह्यात 30 जून पर्यंत मनाई आदेश लागू
| Updated on: Jun 24, 2022 | 8:39 PM
Share

ठाणे : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि त्यांना 42 आमदारांचे मिळालेले समर्थन यामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिंदेंनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले असून महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. बॅनरबाजी, घोषणाबाजी, काळे फासणे आदी प्रकार शिवसैनिकांकडून होत आहेत. तसेच आणखी वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी (Precaution) म्हणून ठाणे जिल्ह्यात (Thane District) 30 जून पर्यंत मनाई आदेश (Restraining Order) लागू करण्यात आले आहेत. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे मनाई आदेश लागू केले आहेत.

पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, दांडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणताही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांमध्ये प्रचार करणे, व्यक्तीचे प्रेत किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, सभ्यतेला धोका पोहचेल असे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे, तत्वे, हावभाव करणे तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश 30 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. (In Thane district the District Collector imposed a restraining order till June 30)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.