जितेंद्र आव्हाड यांना सर्वात मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर, पण अटी-शर्ती लागू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळालाय.

जितेंद्र आव्हाड यांना सर्वात मोठा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर, पण अटी-शर्ती लागू
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 4:18 PM

ठाणे : महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे सेशन कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळालाय. जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या गंभीर आरोपांप्रकरणी आव्हाडांना हा दिलासा मिळालाय. पण कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे पोलिसांना तपासासाठी सहकार्य करणं.

ठाणे कोर्टात सरकारी वकिलांकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळू नये, यासाठी युक्तीवाद केला गेला. वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याप्रकरणी त्यांच्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. पण त्यांचंदेखील आव्हाडांकडून पालन झालं नाही, असा मुद्दा सरकारी वकिलांनी कोर्टात मांडला. आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी देखील विरोध केला. पण आव्हाडांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामुळे त्यांना जामीन मिळाला.

ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने युक्तीवाद केला. चव्हाण यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडीओदेखील कोर्टात सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिलेला नसल्याचं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहीण मानतात. मग बहीण मानणाऱ्या महिलेचा ते विनयभंग कसा करतील? असा सवाल वकिलांना कोर्टात उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाडांना तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याची अट कोर्टाकडून ठेवण्यात आलीय. पोलीस जेव्हा बोलावतील तेव्हा आव्हाडांना पोलीस ठाण्यात हजर राहावं लागेल, असं कोर्टाने नमूद केलंय. त्यानंतर कोर्टाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांचा जामीन मंजूर केला.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येऊ नये. कारण त्यांना जामीन दिल्यास ते तक्रारदारावर दबाव आणू शकतात. पोलिसांनी देखील स्वत: सांगितलं होतं की, या प्रकरणातील आणखी काही फुटेज आणि व्हिडीओ आम्हाला मिळवायचे आहेत. त्यामुळे आव्हाडांना जामीन मिळू नये, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.