चांगलं काम होत असताना काळे झेंडे दाखवतात, त्यांच्या बुद्धीची कीव येते, Kapil Patil यांचं शिवसेनेवर टीकास्त्र

चांगलं काम होत असताना काळे झेंडे दाखवतात, त्यांच्या बुद्धीची कीव येते, Kapil Patil यांचं शिवसेनेवर टीकास्त्र
कपिल पाटील
Image Credit source: TV9

सध्या कोरोना पुन्हा वाढतोय, काळजी घेणं गरजेचं आहे. चीन आणि कोरियामध्ये कोरोना वाढतोय, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. नियम पाळण्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, असं देखील ते म्हणाले.

निनाद करमरकर

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 19, 2022 | 9:58 PM

ठाणे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) हे बदलापूर (Badlapur) मधील एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवसेनेनं त्यांना काळे झेंडे दाखवले. यानंतर कपिल पाटील यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. महाविकास आघाडीत एमआयएम येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यासंदर्भात कपिल पाटील यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 10 तारखेला जे निकाल आले आहेत ते पाहता. आता एमआयएम काय, इतर कुठलेही पक्ष त्यांनी सोबत घेतले तरी मोदींजींना थांबवण्याची ताकद आता कुठल्या पक्षामध्ये राहिलेली नाही, असं कपिल पाटील म्हणाले. सध्या कोरोना पुन्हा वाढतोय, काळजी घेणं गरजेचं आहे. चीन आणि कोरियामध्ये कोरोना वाढतोय, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. नियम पाळण्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, असं देखील ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचं सरकार येणार म्हणून इकडे काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी फटाके फोडायची तयारी केली होती. आमची एकही जागा आली नाही तरी चालेल, पण भाजप हरली म्हणून आम्ही फटाके फोडणार, अशा तयारीत सगळे लोक होते. पण, उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आलं असं म्हणत कपिल पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.

पंजाबचं सूत्र गोव्यात का नाही?

गोव्यामध्ये सुद्धा शिवसेनचे लोक प्रचाराला गेले होते. पंजाबमध्ये आपचं सरकार आल्यावर म्हणतात दिल्लीच्या जवळ आहे म्हणून आलं म्हणतात. मग, महाराष्ट्र आणि गोवा तर एकदम जवळ आहे, तुमची एक पण जागा नाही आली, असं का झालं असा सवाल कपिल पाटील यांनी शिवसेनेला काल.

शिवसैनिकांना फटकारलं

“शहरासाठी चांगलं काम होत असताना जर कुणी काळे झेंडे दाखवत असेल, तर त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे!”, असं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हटलं आहे. बदलापूरमध्ये जिमखान्याच्या भूमिपूजनावेळी शिवसेनेनं कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवले होते.

काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

बदलापुरात शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात जिमखान्याच्या भूमीपूजनावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. पोलिसांनी निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कोणतीही परवानगी नसताना भूमिपूजन होत असल्याचा शिवसैनिकांनी आरोप केला होता.

इतर बातम्या :

Pune Crime : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!

टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें