Kirit Somaiya: रश्मी ठाकरे लबाडी करणार नाहीत, तेजस ठाकरेंनी मनी लॉन्ड्रिंग केलं; सोमय्यांचा नवा बॉम्ब

Kirit Somaiya: रश्मी ठाकरे लबाडी करणार नाहीत, तेजस ठाकरेंनी मनी लॉन्ड्रिंग केलं; सोमय्यांचा नवा बॉम्ब
रश्मी ठाकरे लबाडी करणार नाहीत, तेजस ठाकरेंनी मनी लॉन्ड्रिंग केलं; सोमय्यांचा नवा बॉम्ब
Image Credit source: tv9 marathi

उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेतून बायकोची बाजू घेतली नाही. बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून 19 बंगल्यांचा घोटाळा केला. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक सदस्य घोटाळ्यात आहे.

अक्षय मंकनी, प्रतिनिधी

| Edited By: भीमराव गवळी

May 15, 2022 | 1:08 PM

कल्याण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) या लबाडी करू शकत नाहीत. पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी लबाडी करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या खात्यात हवाला मार्फत सात कोटी रुपये कसे आले? एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनीही मनी लॉन्ड्रिंग केली आहे, असा बॉम्बच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टाकला आहे. किरीट सोमय्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या आज कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं पाप ठाकरे सरकार आणि ठाकरे कुटुंबानं केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर कारवाई होणार आहे. त्यांच्या या भ्रष्टाचारावरून लोकांचं मन वळवण्यासाठीच रोज नवनवे विषय पुढे आणले जात आहेत, असा दावाही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेतून बायकोची बाजू घेतली नाही. बायकोच्या खांद्यावर बंदूक ठेवून 19 बंगल्यांचा घोटाळा केला. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक सदस्य घोटाळ्यात आहे. हिंमत असेल किरीट सोमय्यांचा आकडा खोटा ठरवून दाखवा. लबाड मुख्यमंत्र्यांनी ही लबाडी बंद करावी. आदित्य ठाकरेंनी कोमोद टॉकमध्ये नंदकिशोर चतुर्वेदीकडून सात कोटी रुपये हवाला एन्ट्रीमार्फत घेतले की नाही. हिंमत असेल तर बोला ना. महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं पाप तुमचे सरकार आणि ठाकरे कुटुंब करत आहे. तेजस ठाकरेंनीही मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, असं सोमय्या म्हणाले.

कोणत्या रश्मी वहिनी असली? कोणत्या नकली?

तुमची पत्नी रश्मी ठाकरे कोणती असली? कोणती नकली? सांगा जरा महाराष्ट्रातील जनतेला. रश्मी ठाकरेंनी 23 मे 2019 रोजी महाराष्ट्र सरकारला एक पत्रं दिलो होतं. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2021 रोजी सरकारला दुसरं पत्रं दिलं. यातील आमच्या कोणत्या रश्मी वहिनी असली आणि कोणत्या नकली आहेत. हे उद्धव ठाकरेच सांगू शकतात. 2019च्या पत्रात लिहिलं कोर्लईत त्यांचे 19 बंगले आहेत. अन्वय नाईककडून हे बंगले विकत घेतले. माझ्या नावावर बंगले करा, असं रश्मी ठाकरेंनी पत्रात लिहिलं. पैसे दिल्याचं नमूद केलं.

2020 मध्ये या बंगल्यांचा रश्मी ठाकरेंनी प्रॉपर्टी टॅक्स भरला. 2019पासूनचा टॅक्स भरला. 2021चं पत्रं आहे. त्यात त्या म्हणतात माझ्याकडे 19 बंगले नव्हतेच. कधीच नव्हते. आम्ही जागा घेतली तेव्हाही बंगले नव्हते, असं घुमजाव रश्मी ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर याबाबत स्पष्टता करावी. माईकवर एवढे बोंबलता ना, मग हे सांगा. रश्मी ठाकरे खोट्या आहेत की उद्धव ठाकरे आहेत. लबाडी कोण करतंय? रश्मी वहिनी लबाडी करू शकत नाहीत. पण त्यांचे पती खुर्चीसाठी लबाडी करत आहेत, अशी टीका सोमय्या यांनी केली. तेजसनेही मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. श्रीधर पटवर्धन. शिवाजी पार्कवर कॅटरिंग कॉलेजच्या बाजूला श्री जी होम कुणाचं आहे? मला वहिनींवर जास्त बोलायचं नाही, असंही ते म्हणाले.

आज करारा जवाब मिळणार

उद्धव ठाकरे हे नाटक करत आहेत. जनता ठाकरे सरकारला उत्तर देईल. आज करारा जवाब मिलेगा, असा इशाराही त्यांनी दिला. गोल देऊळ मंदिरात कधी घंटानाद आणि आरती बंद झाली नव्हती. पण हिरवा रंग परिधान केलेल्या उद्धव ठाकरे यांनी घंटा काढून घेतला आहे. काल मी तिथे जाऊन आरती केली आणि घंटानाद सुद्धा केला. अजान बंद केली म्हणून साईबाबाची आरती बंद झाली, असं ते म्हणाले.

काही जेलमध्ये तर काही बेलवर

माजी महापौर महाडेश्वर यांना माझ्यावर हल्ला प्रकरणात अटक केली आणि सोडून दिलं. मला जर ती काच डोळ्यात लागली असती तर माझं काय झालं असत? आणि तुम्ही त्याला केचप म्हणता?, असा संतप्त सवाल त्यांनी केला. तुमचे अनेक शिवसेना नेते हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, अनिल परब हे सगळे अडकले आहेत. त्यातले काही जेलमध्ये, काही बेलवर बाहेर आहेत आणि काही जण हॉस्पिटलमध्ये आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे डरपोक

उद्धव ठाकरे हे डरपोक आहेत. शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर तीनवेळा हल्ला केला आहे. हे पोलिसांच्या FIR मध्ये नमूद आहे. असली आणि नकली काय आहे हे जनतेला माहीत आहे. माफिया सेनेच्या सरदारांवर कारवाई होणार आहे. त्यामुळेच इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी मुख्यमंत्री हे वक्तव्य करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें