ऊर्फी, सनी लिओनी चालतात, मग गौतमी पाटील हिच्यावरच टीका का?; जितेंद्र आव्हाड यांना सवाल

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दिवाळी पहाटे निमित्ताने गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर स्मार्ट सिटी बदलत असल्याची टीका केली आहे. दिवाळीची सुरुवात आता लावणीने होते, हे ठाण्यातच घडू शकतं, असं आव्हाड म्हणाले. आव्हाड यांच्या या टीकेचा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी समाचार घेतला आहे.

ऊर्फी, सनी लिओनी चालतात, मग गौतमी पाटील हिच्यावरच टीका का?; जितेंद्र आव्हाड यांना सवाल
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 3:26 PM

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 14 नोव्हेंबर 2023 : शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठाण्यात ठेवला होता. दिवाळी पहाट निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला भल्या पहाटेही तरुणाईने मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर टीका केली होती. पूर्वी दिवाळी पहाटेला शास्त्रीय गायन ऐकायला मिळायचं. आता लावणी ऐकायला मिळते. परिवर्तन होत आहे, असा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला होता. आव्हाड यांच्या या टीकेचा मीनाक्षी शिंदे यांनी समाचार घेतला आहे.

मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ऊर्फी जावेद, राखी सावंत, सनी लिओनी आणि क्रिकेट सामन्यांमध्ये नाचणाऱ्या चेअर्स गर्ल तुम्हाला चालतात. पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी पाटील चालत नाही, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली.

आव्हाडांच्या पोटात दुखलं

गौतमी पाटील यांनी माझ्या स्टेजवरत कार्यक्रम केला. आमच्या कार्यक्रमाची गर्दी पाहून आव्हाड यांच्या पोटात दुखलं. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका केली. त्यांनी कलाकारांचा देखील अपमान केला. मुंब्र्यात आम्ही त्यांना पळवून लावले आहे. महिला असो की पुरुष त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे त्याच वृत्तीने बघतात म्हणून त्यांना तसे दिसते. गौतमी पाटील ही कलाकार आहे आणि ठाणेकरांनी तिला चांगल्या दृष्टिकोणातून पाहिले आहे. तिच्यासाटी पहाटे पासूनच लोक जमले होते, असंही शिंदे यांनी सांगितलं.

दोन बडे नेते बरळले

दोन बडे नेते जे बरळगले आहेत त्यांची बालबुद्धीची मला किव येते. सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले ते चुकीचं आहे. दिवाळी पहाटेची व्याख्या काय आहे त्यांना कळलं नाही का? आणि कोणी ठरवलं हे मला माहीत नाही. लोककलेचा सन्मान ठाणेकर करत आहेत. कलाकारांचा आदर करणे ही ठाणेकरांची संस्कृती आहे, असंही त्या म्हणाल्या.

सनई चौघडे वाजवून दिवाळी साजरी करतात का?

जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. या आधी कुणी सनई चौघडे वाजवून दिवाळी पहाट कार्यक्रम केला आहे का? आम्ही स्मार्ट सिटी आहोत. स्मार्ट सिटीत राहणाऱ्या लोकांनी काय खावं याचंही आम्हाला भान आहे. महिला म्हणून एका महिलेचा सन्मान होणार गरजेच आहे, असं त्या म्हणाल्या.

अक्काबाई द्वेष्ट्या

सुषमा अंधारे यांची अंधारी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर आली आहे. कधीतरी उद्धव ठाकरे फीट येऊन पडतील. अंधारे अक्काबाई या हिंदू द्वेष्ट्या आहेत. त्या नेहमीच एकपात्री नाटक करत असतात. बाळासाहेबांना थेरडे म्हणून उल्लेख करत होत्या. त्या बाईला आम्ही काय बोलावं? उद्धव ठाकरे अशा महिलेला बाजूला बसवतात. ही एक शोकांतिका आहे, अशी टाकी त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.