
मागच्या आठवड्यात महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निकाल जाहीर झाले. या निकालानंतर ठाण्याला लागून असलेल्या मुंब्रा भागातील एक नगरसेविका व्हायरल झाली. तिचं नाव सहर शेख. MIM पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली व सहर शेख निवडून आल्या. निकालानंतर सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं म्हटलं. भाषणा करतानाची त्यांची ‘कैसा हराया’ स्टाइल त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार या सहर शेख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट दिली.
सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. सहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुंब्रा वरिष्ठ पोलिस पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना भेटणार आहेत. पूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं निवडून आल्यावर सहर शेख यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याबाबत सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांना मुंब्रा पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्याच नोटिसचं पुढे काय झालं? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जाब विचारण्यासाठी किरीट सोमय्या मुंब्रा पोलिस ठाण्यात येणार आहेत.
3 दिवसापूर्वी नोटीस बजावली
मुंब्र्यातील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांना मुंब्रा पोलिसांनी 3 दिवसापूर्वी नोटीस बजावली होतं. चिथावणीखोर वक्तव्य करु नये ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल तसेच स्टेटमेंट सार्वजनिक आणि सोशल मीडियावर देखील करू नका असं म्हणत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली आहे.
सहर शेखच्या “माफीनामा”
AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या
“हम मुंब्रा को हरा बना देंगे”
ह्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.मुंब्रा पोलिसांनी माझा तक्रारी नंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुरावा साठी मुंब्रा पोलिस… pic.twitter.com/ln9LaeESQe
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 24, 2026
बांगलादेशीं विरुद्ध देखील कारवाई
‘मुंब्रा को हरा बना देंगे’ या वक्तव्यावर सहर शेख यांनी माफीनामा दिला आहे. कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षण अनिल शिंदे यांनी किरीट सोमय्या यांना सांगितलं आहे तसेच बांगलादेशीं विरुद्ध देखील मुंब्रा पोलिसांनी कारवाई केली आहे असं पोलिसांनी सोमय्या यांना सांगितलं आहे.