AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO: कर्मचाऱ्यांना लॉटरी, खात्यात जमा होणार 46,000 रुपये, आनंदवार्ता काय?

EPFO Members Bonus: देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. त्यांच्या पीएफ खात्यात 46,000 रुपये लवकरच जमा होणार आहे. पण ही रक्कम आहे तरी कशाची? सरकार का जमा करत आहे ही रक्कम?

EPFO: कर्मचाऱ्यांना लॉटरी, खात्यात जमा होणार 46,000 रुपये, आनंदवार्ता काय?
ईपीएफओ, कर्मचाऱ्यांना लॉटरीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 24, 2026 | 2:04 PM
Share

EPFO Members Bonus: प्रोव्हिडंड फंड सदस्यांना लॉटरी लागणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करणार आहे. पीएफ बॅलन्सवर वार्षिक व्याजाची रक्कम अतिरिक्त पेमेंट म्हणून जमा होणार आहे. अर्थात ही रक्कम खात्यातील बॅलन्सवर आधारीत असेल. पीएफ खात्यात जवळपास 46,000 रुपयांचा बोनस येणार आहे. अर्थात प्रत्येकाच्या खात्यात बॅलन्सनुसार ही रक्कम कमी-जास्त होऊ शकते. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार की नाही हे कर्मचाऱ्याला तपासता येईल.

काय आहे 46 हजार रुपयांचे बोनस?

EPFO सदस्यांना चालू आर्थिक वर्षाच्या बॅलेन्सवरील व्याज देण्यात येईल. प्रत्येक वर्षी EPFO प्रोव्हिडंट फंडवरील रक्कमेवर व्याज दराची घोषणा करते. त्या दराच्या आधारावर जमा रक्कमेवर व्याज देण्यात येते. ही व्याजाची रक्कम बॅलन्सनुसार असते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात 46,000 रुपये अथवा त्यापेक्षा कमी अधिक रक्कम जमा होईल. ज्यांच्या खात्यात शिल्लक रक्कम आहे. त्या बचतीवर पीएफ व्याजदरानुसार रक्कम जमा होईल.

ईपीएफओवर असे तपासा शिल्लक रक्कम (How to view EPF passbook on EPFO portal?)

ईपीएफओ खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा करेल. तेव्हा तुमच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे या पद्धतीने तपासा.

स्टेप-1: UAN सदस्य ईपीएफओ पोर्टलला (EPFO Portal) ब्राऊझरमध्ये उघडा

स्टेप-2: तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा

स्टेप-3: नंतर मोबाइल OTP व्हेरिफिकेशन करा

स्टेप-4: लॉगिन झाल्यानंतर Passbook Lite वर जा आणि डाऊनलोड करा. येथे पीएफ बँलेन्स दिसेल

उमंग ॲपवर तपासा(How to check EPF passbook through Umang app)

स्टेप-1: UMANG App प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून लॉगिन करा

स्टेप-2: सर्चमध्ये EPFO लिहा

स्टेप-3: आता View Passbook वर क्लिक करा

स्टेप-4: तुमचा UAN क्रमांक टाका

स्टेप-5: मोबाईलवर आलेला OTP सबमिट करा

स्टेप-6: Member ID निवडून पासबुक डाऊनलोड करा. पासबुक उघडल्यावर पीएफ बॅलेन्स तपासा

EPFO दरवर्षी व्याजाची रक्कम सदस्यांच्या खात्यात जमा करते. या वर्षी 8.25% व्याज देण्यात आला आहे. आता प्रत्येक कर्मचाऱ्यांना 2025-26 साठी नवीन व्याजदराची प्रतिक्षा आहे. हा व्याजदर अधिक असण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी लागेल. त्यांच्या खात्यात व्याजाची मोठी रक्कम जमा होईल. ही रक्कम पीएफ खात्यातील बॅलन्सवर अवलंबून असले. त्यानुसार व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....