राज्यातल्या ‘या’ महानगरपालिकेत दहा वर्षात दहा आयुक्तांच्या बदल्या, महापौर भडकल्या

मिरा भाईंदर शहराच्या महापौर जोत्स्ना हसनाळे यांनी वारंवार होणाऱ्या महापौरांच्या बदल्यांवर संताप व्यक्त केला. Mira Bhayandar Mayor Jotsna Hsnale

  • रमेश शर्मा, टीव्ही 9 मराठी, मिरा भाईंदर
  • Published On - 20:25 PM, 5 Mar 2021
राज्यातल्या 'या' महानगरपालिकेत दहा वर्षात दहा आयुक्तांच्या बदल्या, महापौर भडकल्या
मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर महानगरपालिकेत दहा वर्षात दहा आयुक्तांच्या बदल्या झाल्यानं महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी संताप व्यक्त केला आहे. दहापैकी एकाच वर्षात चार आयुक्तांच्या बदल्या झाल्याने ज्योत्स्ना हसनाळे यांनी शासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत. (Mira Bhayandar Mayor Jotsna Hsnale angry over transfers of commissioners in last ten years)

महापौर आयुक्तांच्या बदल्यावर भडकल्या

मिरा भाईंदर शहराच्या महापौर जोत्स्ना हसनाळे यांनी वारंवार होणाऱ्या महापौरांच्या बदल्यांवर संताप व्यक्त केला. मीरा भाईंदर मध्ये दहा वर्षात दहा आयुक्त येऊन गेले. कोरोना काळात चार आयुक्तांच्या बदल्या झाल्या. एक आयुक्त येतो महापालिकेची कामकाजाची पद्धत समजून घेईपर्यंत तर त्याची बदली होऊन त्या ठिकाणी दुसरा आयुक्त येतो, मनपाला समजतो आणि त्याचा बदली होते, असाच कारभार सुरु आहे, असं जोत्स्ना हसनाळे म्हणाल्या.

कोरोना काळात चार आयुक्तांच्या बदल्या

कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर मीरा भाईंदर महापालिकेतील आयुक्त बालाजी खतगावकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, आयुक्त विजय राठोड आणि नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्या बदल्या झाल्या. मीरा भाईंदर मनपामध्ये काय चाललंय? अशा पद्धतीच्या बदल्या थांबल्या पाहिजेत. या बदल्यांच्या पाठीमागे शासनाच्या हेतू काय आहे. शहरात आयुक्तांच्या बदल्यामुळे पालिकेच्या विकास कामावर फार मोठा परिणाम होत आहे, असंही जोत्स्ना हसनाळे म्हणाल्या.

दिलीप ढोले यांच्याकडे आयुक्तपदाची जबाबदारी

मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय राठोड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले दिलीप ढोले यांची नेमणुक करण्यात आली आहे. तर डॉ. विजय राठोड यांच्यावर जालना जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मिरा भाईंदर शहरात कोरोनाचा कहर वाढत असल्या कारणाने बदली केली गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

मीरा भाईंदर महानगरपालिका 2021-22 या आर्थिक वर्षांकरीता 1509 कोटी 17 लाख 35 हजार रुपयांचा अर्थसंकल्प आज प्रशासनाने स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांना सादर केला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत झालेली घट आणि कोरोनाच्या मंदीमुळे आटलेले विकास शुल्क आदी विविध कारणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या महसुलात घट झाली आहे. आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात काटकसरीला प्राधान्य देऊन कोणतीही कर किंवा दर वाढ करण्यात आलेली नाही तर काट काटकसरीला प्राधान्य देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


संबंधित बातम्या

वसईत ‘बविआ’सोबत आघाडीसाठी ‘मविआ’ उत्सुक, जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?

भिवंडीत राजकारण तापलं, पालिका विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला नगरविकास विभागाची स्थगिती

(Mira Bhayandar Mayor Jotsna Hsnale angry over transfers of commissioners in last ten years)