AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत ‘बविआ’सोबत आघाडीसाठी ‘मविआ’ उत्सुक, जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?

युती झाली तरी सत्ताधारी बविआ महाविकास आघाडीला किती जागा देणार, हा प्रश्न आहे. (Vasai Virar Maha Vikas Aghadi )

वसईत 'बविआ'सोबत आघाडीसाठी 'मविआ' उत्सुक, जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?
वसई विरार महापालिकेत बविआ आणि मविआ यांच्या युतीचे संकेत
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 4:59 PM
Share

वसई : वसई विरार महापालिका निवडणुकांच्या (Vasai Virar Municipal Corporation Elections 2021) तोंडावर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीसोबत (Bahujan Vikas Aghadi) युती करण्यासाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) इच्छुक असल्याचं समोर येत आहे. युती झाली तरी सत्ताधारी बविआ महाविकास आघाडीला किती जागा देणार, हा प्रश्न आहे. (Vasai Virar Municipal Corporation Elections 2021 Maha Vikas Aghadi wishes alliance with Bahujan Vikas Aghadi)

गेल्या महापालिका निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेना, भाजप यांनी बहुजन विकास आघाडीविरोधात मोठी ताकद लावली होती. परंतु तरीही एकहाती सत्ता मिळविण्यात हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचा बविआ पक्ष यशस्वी झाला. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार, याची उत्सुकता आहे.

बहुजन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता

115 नगरसेवकांपैकी तब्बल 107 नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत, तर भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे. वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.

कोणत्या पक्षाकडून कोणाला जबाबदारी?

हितेंद्र ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचा दाखला देत यंदाच्या निवडणुकीत सर्वच 115 जागा जिंकणार, असा विश्वास बहुजन विकास आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह रंगत येणार, यात शंका नाही. (Vasai Virar Municipal Corporation Elections 2021 Maha Vikas Aghadi wishes alliance with Bahujan Vikas Aghadi)

वसई विरार महापालिका पक्षीय बलाबल

बविआ – 107 शिवसेना – 05 भाजप – 01 अपक्ष – 01 (मनसे पुरस्कृत) अपक्ष – 01 (बविआ पुरस्कृत) काँग्रेस, राष्ट्रवादी – एकही नाही

एकूण नगरसेवक – 115

संबंधित बातम्या :

‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट

वसई-विरार महापालिका : ‘बविआ’च्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी सर्वपक्षीय सज्ज, ठाकूरांना फडणवीस, शिंदेंचे आव्हान

(Vasai Virar Municipal Corporation Elections 2021 Maha Vikas Aghadi wishes alliance with Bahujan Vikas Aghadi)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.