वसई-विरार महापालिका : ‘बविआ’च्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी सर्वपक्षीय सज्ज, ठाकूरांना फडणवीस, शिंदेंचे आव्हान

वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. (Vasai Virar Municipal Elections)

वसई-विरार महापालिका : 'बविआ'च्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी सर्वपक्षीय सज्ज, ठाकूरांना फडणवीस, शिंदेंचे आव्हान
हितेंद्र ठाकूर, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अविनाश जाधव
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:56 PM

वसई विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेची (Vasai Virar Municipal Elections 2021) तिसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची एकहाती सत्ता आहे. ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. (Vasai Virar Municipal Elections 2021 BVA BJP Shivsena MNS)

115 नगरसेवकांपैकी तब्बल 107 नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत, तर भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे. वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचं अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.

कोणत्या पक्षाकडून कोणाला जबाबदारी?

ठाकूरांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचा दाखला देत यंदाच्या निवडणुकीत सर्वच 115 जागा जिंकणार, असा विश्वास बहुजन विकास आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह रंगत येणार, यात शंका नाही. (Vasai Virar Municipal Elections 2021 BVA BJP Shivsena MNS)

वसई विरार महापालिका पक्षीय बलाबल

बहुजन विकास आघाडी – 107 शिवसेना – 05 भाजप – 01 मनसे – 01 अपक्ष – 01 एकूण – 115

संबंधित बातम्या :

‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट

(Vasai Virar Municipal Elections 2021 BVA BJP Shivsena MNS)

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.