मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू

भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. Bhayandar West Rose Villa building

मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू
मीरा भाईंदर इमारत दुर्घटना

मीरा भाईंदर: मान्सून पावसाला सुरुवात झाल्यानंतर इमारत दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील इमारत कोसळणे, स्लॅब कोसळण्याचे प्रकार आता मीरा भाईंदर शहरापर्यंत पोहोचले आहेत. भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Mira Bhayandar West Rose Villa building slap collapsed one person died)

दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू

भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कॅमी ब्रिटो वय 39 असं मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

अग्निशमन दलाकडून पाहणी

रोज विल्ला इमारतीमधील सिलिंग कोसळल्याची घटना पुढे आल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी अग्निशमन दलानं पाहणी केली आहे.

इमारत दुर्घटना सुरुच

नवी मुंबईतील नेरुळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी रात्री नेरुळ येथे ही घटना घडली.

मालाडमध्ये इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात दोन दिवसांपूर्वीच इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश होता. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश होता. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

संबंधित बातम्या:

Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले

Malad Building Collapsed | मी बाहेर पडलो आणि तीन इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या, मालाड इमारत दुर्घटना नेमकी कशी घडली?

Mira Bhayandar West Rose Villa building slap collapsed one person died

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI