AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरे, मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार’, राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य

"आमच्यासाठी राज ठाकरे यांची सभा ही पर्वणीच असते. पण आमच्यासारखेच बहुसंख्य शिवसैनिक, मराठी माणूस राज ठाकरे यांना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला आसूसलेला होता. त्यांची आज या निवडणुकीच्या निमित्ताने याबाबतची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे", असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले.

'धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरे, मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार', राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरे आणि राजू पाटील यांचा फोटो
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 12, 2024 | 5:13 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांची आज पहिल्यांदाच ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे शहरालगत असलेल्या कळव्यात राज ठाकरे यांची आज सभा पार पडत आहे. या सभेसाठी कल्याण, डोंबिवली येथील मनसैनिक आणि शिवसैनिकदेखील कळव्याला दाखल होत आहेत. राज ठाकरे यांची ही सभा शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली आहे. या सभेनिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी राजू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं.

“मराठी माणूस राज ठाकरेंना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला उत्सुक आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत”, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “ठाकरेंनी हिंदुत्वासोबत असावं ही हिंदुत्वाची इच्छा पूर्ण होणार. तसचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर मी फार बोलणार नाही”, अशी टीकादेखील राजू पाटील यांनी केली आहे.

‘मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार’

“आमच्यासाठी राज ठाकरे यांची सभा ही पर्वणीच असते. पण आमच्यासारखेच बहुसंख्य शिवसैनिक, मराठी माणूस राज ठाकरे यांना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला आसूसलेला होता. त्यांची आज या निवडणुकीच्या निमित्ताने याबाबतची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही भरभरुन जसे जाणार आहोत तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिकही तिथे जाणार आहेत”, असं राजू पाटील म्हणाले.

‘राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप’

“राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा राज ठाकरे हेच चालवत आहेत. हे तुम्हाला सध्या दिसत आहे. इतर लोकं कुणाच्या मागे फरफटत गेले ते सुद्धा दिसत आहे. त्यांची एक इच्छा होती की, ठाकरे नाव हे हिंदुत्वासोबत असलं पाहिजे, आमच्यासोबत असलं पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत असलं पाहिजे. आज ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे ते आनंदात आहे”, असा दावा राजू पाटील यांनी केला.

यावेळी राजू पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत हे महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. ते कुठला संदर्भ कधी देतील याचा काही थांगपत्ता नाही. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना