AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Sabha : ‘मुंब्य्राची म्हैस’ म्हणत संदीप देशपांडेंनी अप्रत्यक्षपणे आव्हाडांवर तोफ डागली!

शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधीपासून डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. पण हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र लावलं की तुम्ही डिवचले जात असाल म्हणजे तुमचा भगवा रंग शंका घेण्यासारखा आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

Raj Thackeray Sabha : 'मुंब्य्राची म्हैस' म्हणत संदीप देशपांडेंनी अप्रत्यक्षपणे आव्हाडांवर तोफ डागली!
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 12, 2022 | 8:28 PM
Share

ठाणे : मनसेची उत्तर सभा ठाण्यात होत आहे. या सभेत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)वर तोफ डागली आहे. यावेळी आपल्या भाषणात देशपांडेंनी शिवसेनेसह राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इशरत जहॉला पाठिंबा देणारे तुम्ही. अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून पाठिंबा देणार तुम्ही. तुम्ही आम्हाला सांगणार. आम्ही सगळे प्रभू श्रीरामचंद्राचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावण्याचा प्रयत्न करु नका. तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. आमचं आव्हान आहे. समोरासमोर या, मग बघू; असा इशारा संदीप देशपांडेंनी ‘मुंब्य्राची म्हैस‘ असा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. (MNS leader Sandeep Deshpande targeted NCP leader Jitendra Awhad at the MNS sabha in Thane)

येत्या महापालिकेत शिवसेना संपलेला असेल

शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधीपासून डिवचायला लागली. मी हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी केलं, वेगळं काहीतरी केलं तर मी समजू शकतो. पण हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र लावलं की तुम्ही डिवचले जात असाल म्हणजे तुमचा भगवा रंग शंका घेण्यासारखा आहे, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघालेले आहात. माझ्या घरासमोर लावा हनुमान चालीसा. येत्या महानगरपालिकेत शिवसेना संपलेली दिसेल, असे देशपांडे पुढे म्हणाले. (MNS leader Sandeep Deshpande targeted NCP leader Jitendra Awhad at the MNS sabha in Thane)

इतर बातम्या

Raj Thackeray Sabha : नुसती गाणी वाजवून चालणार नाहीये!’ ठाण्यातील उत्तरसभेत ‘राजगर्जने’आधी वसंत मोरे गरजले

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.