5

आगरी समाजाची मनधरणी, महापालिका निवडणूक, तीन जिल्ह्यांचे राजकीय गणितं, कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रिपद देण्यामागील खरी कारणं

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपचं विशेष राजकीय गणित असल्याची देखील चर्चा आहे (BJP gives opportunity to MP Kapil Patil for Union Cabinet Minister).

आगरी समाजाची मनधरणी, महापालिका निवडणूक, तीन जिल्ह्यांचे राजकीय गणितं, कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रिपद देण्यामागील खरी कारणं
खासदार कपिल पाटील
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:44 PM

कल्याण (ठाणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात 43 नव्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. नव्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपचं विशेष राजकीय गणित असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत नेमकी चर्चा काय सुरुय याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (BJP gives opportunity to MP Kapil Patil for Union Cabinet Minister).

कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात भाजपचं गणित नेमकं काय?

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं बिगूल कधीही वाजू शकतं. आगामी काळात कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विश्वास संपादन करण्यात भाजप यशस्वी होईल, ज्यामुळे या भागातील बहुसंख्य विधानसभा मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार आहे (BJP gives opportunity to MP Kapil Patil for Union Cabinet Minister).

नवी मुंबई विमानतळाचा नमांतराचा मुद्दा

नवी मुंबईत सध्या विमानतळाच्या नामांतराचा वाद आहे. यात कपिल पाटील यांनी लोकनेते दि बा पाटलांच्या नावाला पाठिंबा दिल्याने आता कोळी-आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजपने कपिल पाटील यांना मंत्रीपद देऊन ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात आगरी समाजाचा संघर्ष अधिक करण्याची भाजपची रणनीती असल्याचे दिसून येत आहे.

कपिल पाटलांना कोणतं मंत्रिपद मिळणार ते देखील महत्त्वाचं

कपिल पाटील यांना कोणतं मंत्रिपद मिळणार यावर देखील पुढील राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीचा विचार केल्यास कपिल पाटील हे ओबीसी, आगरी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, ते ज्या लोकसभा क्षेत्रात आहेत त्याभागात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात सेनेच्या असणाऱ्या वर्चस्वाला शह देण्याची भाजपाची खेळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.

कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास

कपील पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय करकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

जन्म – 5 मार्च 1961 जन्मगाव – हायवे दिवे ता.भिवंडी शिक्षण – बी ए मुंबई विद्यापीठ सरपंच – 1988 – 1992 ग्रामपंचायत दिवे अंजुर सदस्य – 1992 – 1996 पंचायत समिती भिवंडी सभापती – 1997 पंचायत समिती भिवंडी सदस्य – 2002 – 2007 जिल्हा परिषद ठाणे सभापती – 2005 – 2007 जिल्हा परिषद कृषी समिती अध्यक्ष – 2009 – 2012 जिल्हा परिषद ठाणे अध्यक्ष – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे सतत 2010 – 2011 आणि 2011 – 2012 या दोन वर्षात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कार कपिल पाटील यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला आहे.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle: संभाव्य चर्चेला पूर्णविराम, महाराष्ट्रातून 4 नेते मंत्रीपदी, राणे, कराड, पवार, पाटलांना संधी, 43 मंत्र्यांची अधिकृत यादी एका क्लिकवर

खासदार कपिल पाटील यांचं केंद्रीय मंत्रिपद निश्चित, कसा आहे पाटलांचा राजकीय आलेख?

Non Stop LIVE Update
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ
गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ